मावळ गोळीबार : शेतकऱ्यांच्या वारसांना मिळनार नोकरी 

'सरकारी काम आणि दहा दिवस थांब' नाही, तर दहा वर्षे सरकारने दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी या जखमींना थांबावे लागले.
मावळ गोळीबार : शेतकऱ्यांच्या वारसांना मिळनार नोकरी 
pcmc.jpg

पिंपरी : मावळ (जि.पुणे) गोळीबारातील १२ जखमींना दहा वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. 'सरकारी काम आणि दहा दिवस थांब' नाही, तर दहा वर्षे सरकारने दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी या जखमींना थांबावे लागले. 

दरम्यान, ज्याविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात तीन बळी जाऊन बाराजण जखमी झाले. तो पवना बंद जलवाहिनी प्रकल्प गेल्या १० वर्षांपासून बंदच आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा पवना धरणातून होत आहे. त्यासाठी धरणातून पवना नदीत सोडलेले पाणी शहराजवळील रावेत बंधारा येथे उचलण्यात येते. दरम्यान, ३५ किलोमीटरच्या या अंतरात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. ते झिरपते त्याचे, बाष्पीभवन होते, चोरी होते. 

तसेच त्याच्या शुद्धीकरणावर अधिकचा खर्च तो वेगळाच. म्हणून २००७ मध्ये धरणापासून शहरापर्यंत बंद जलवाहिनीतून पाणी आणण्यासाठी २३४ कोटी रुपये खर्चाची योजना मंजूर करण्यात आली. परंतु तो सुरु होण्यास विलंब झाल्याने त्याचा खर्च चारशे कोटीवर गेला. आता, तर तो हजार कोटीच्या घरात गेलेला असेल. त्यावेळी राज्यात दोन्ही काँग्रेसचे सरकार होते. अजित पवार उपमुख्यमंत्री होते, भारतीय जनता पक्षाचा या योजनेला विरोध होता व अद्यापही आहे.

हे काम सुरु होऊन १२५ कोटी रुपये तीन वर्षात खर्च झाले. त्यानंतर २०११ ला हे आंदोलन व गोळीबार झाला होता. त्यावेळी संदीप कर्णिक हे पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक होते. या गोळीबारानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली. २०१४ मध्ये राज्यात सत्ताबदल झाला. त्यांनी हा प्रकल्पच रद्द करणार असल्याचे जाहीर केले. पण,२०१९ ला पिंपरी पालिकेत त्यांची सत्ता येताच त्यांनी या योजनेचा सुधारित प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी ८० लाख रुपये खर्चाला मंजुरी दिली. आता अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री आहेत. तर, राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेचा स्थानिक पातळीवर या योजनेला विरोध कायम आहे.

पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात ९ ऑगस्ट २०११ ला क्रांतिदिनी मावळ बंद पुकारण्यात आला होता. तो  सुरू असताना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बऊर येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. ही बातमी वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली. तालुक्यातून अनेकांनी धाव घेतली. त्यामुळे हे आंदोलन तीव्र झाले. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे व श्यामराव तुपे मरण पावले, तर १२ जण जखमी झाले होते.  

Edited By - Amol Jaybhaye  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in