मोठा दिलासा : दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आली निम्यावर
Great relief : The number of corona patients found daily in Pimpri Chinchwad has halved

मोठा दिलासा : दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आली निम्यावर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे.

पिंपरी  ः  गेले काही दिवस दररोज दोन हजारांवर कोरोना रुग्ण (corona patients) आढळणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) शनिवारी (ता.१५ मे) हा आकडा हजाराच्या आत आल्याने प्रशासनाला मोठा दिलासा (Great relief) मिळाला. दुसरीकडे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. (Great relief : The number of corona patients found daily in Pimpri Chinchwad has halved)

दोन हजारांवरील दररोजचे नवे रुग्ण आणि शंभराच्या घरातील मृत्यूंमुळे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या जोडीने सत्ताधारी भाजप व या पक्षाचे आमदार असलेले शहराचे दोन्ही कारभारी यांची चिंता गेल्या काही दिवसांत वाढली होती. मात्र, आयुक्त राजेश पाटील व त्यांच्या टीमच्या सर्वांगीण उपाय योजनांमुळे कोरोना नियंत्रणात येण्यास हातभार लागतो आहे. 

पिंपरी चिंचवड शहरात आज  ९५९ नवे रुग्ण मिळून आले. तर, दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या त्यापेक्षा दुप्पट म्हणजे दोन हजार एकशे पाचवर गेली. शंभराच्या घरात गेलेला बळींचा आकडाही थोडा कमी होऊन आज तो ७९ वर आला. मात्र, गेल्या २४ तासांत फक्त ९ जण कोरोनामुळे मरण पावले असून बाकीचे मृत्यू अगोदरचे असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, आतापर्यंत शहरातील दोन लाख १७ हजार ७९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या शहरात १९ हजार ४२३ सक्रिय रुग्ण असून त्यातील १३ हजार ७७५ गृह विलगीकरणात आहेत.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहर कोरोनामुक्त करण्याच्या हेतूने महापालिकेने कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आता जागतिक निविदा काढायचे ठरवले आहे. तशा सूचना महापौर माई ढोरे यांनी आज स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांना दिल्या आहेत. ग्लोबल टेंडर काढण्यामागील कारण देताना राज्य सरकारकडून या लसीचा पुरवठा पुरेसा होत नसल्याचा ठपका पालिकेने ठेवला आहे. 

आता या ग्लोबल टेंडरद्वारे श्रीमंत असलेली पिंपरी चिंचवड महापालिका प्रत्येक शहरवासियाला ही लस देण्यासाठी ती स्वखर्चातून खरेदी करणार आहे. तसे झाले आणि पुरेशी लस मिळाली, तर कोरोना नियंत्रणात येऊन त्याची रुग्णसंख्या निश्चीत रोडावेल, असा ठाम दावा महापालिका पदाधिकारी व प्रशासनाने केला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in