माजी आमदार विलास लांडे शास्तीकर माफीसाठी आक्रमक 
Former MLA Vilas Lande aggressive for tax waiver

माजी आमदार विलास लांडे शास्तीकर माफीसाठी आक्रमक 

शास्तीकर थकबाकीचा निर्णय सरकारी पातळीवर फेरविचारासाठी प्रलंबित असताना त्यासाठी अट्टहास का केला जातो आहे?

पिंपरी : शास्तीकर माफीसाठी समिती स्थापन करून तिच्यामार्फत लढा सुरू केलेले भोसरीचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विलास लांडे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील हा कर पूर्णपणे माफ करण्याची मागणी नवीन आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली. 

राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये शास्तीकर नसताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ती का? शास्तीकर थकबाकीचा निर्णय सरकारी पातळीवर फेरविचारासाठी प्रलंबित असताना त्यासाठी अट्टहास का केला जातो आहे? असा सवाल लांडे यांनी केला आहे. पूर्ण शास्तीकर माफीबाबत तात्काळ बैठक घेऊन त्याचा ठराव राज्य सरकारला पाठवावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, माजी सरपंच गणपत आहेर, चिखली लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब सपकाळ, राजेंद्र चेडे, विलास नढे, उदय पाटील, आतिश बारणे, प्रवीण शिंदे, प्रमोद ताम्हणे व पिंपरी-चिंचवड शास्तीकर निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य हे आयुक्तांना निवेदन देताना उपस्थित होते. 

हेही वाचा : सांगली नव्हे...सांगवी पॅटर्न...पालिका खजिनाच्या चाव्या लांडगेंकडेच... 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सांगली पॅटर्न, नाही, तर स्थानिक सांगवी पॅटर्न चालला. त्यामुळे भाजपचे ऍड. नितीन लांडगे यांचा पाच मतांनी (दहा विरुद्ध पाच) विजय झाला. 

भाजपमधील नाराजीमुळे पिंपरीत सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची चर्चा होती. पण, ती चर्चाच राहिली. आगामी निवडणुकीनिमित्त फक्त राष्ट्रवादीने वातावरणनिर्मिती करुन घेतली. शहराचे कारभारी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थायीतील सहसमर्थक सदस्यांनी साथ दिल्याने दुसरे कारभारी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे समर्थक नितीन लांडगे यांचा दणदणीत विजय झाला. 

स्थायी अध्यक्षपदी संधी न मिळाल्याने स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले भाजपचे भोसरीतील नगरसेवक रवी लांडगे हे मतदानासाठी आले नाही. त्यामुळे 16 पैकी 15 जणांनी मतदान केले. त्यात भाजपच्या नऊच्या बळाला अपक्ष आघाडीच्या एका सदस्याची साथ मिळाली. विरोधी उमेदवार राष्ट्रवादीचे पंकज भालेकर यांच्या पारड्यात त्यांच्या पक्षाची चार व शिवसेनेचे एक अशी पाच मते पडली. तत्पूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते राष्ट्रवादीचे राजू मिसाळ यांच्या अँटी चेंबरमध्ये येऊन निवड बिनविरोध करण्याची विनंती केली होती. 

भाऊ हे सांगवीत राहतात. तो त्यांचा बालेकिल्ला आहे. स्थायीतील काही सदस्यही त्या भागातील त्यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी भोसरीला म्हणजे दादा समर्थक लांडगेंना साथ व मते दिल्याने पिंपरीत सांगली नाही, तर स्थानिक सांगवी पॅटर्न चालल्याची चर्चा या निवडणुकीनंतर पालिकेत होती. यानिमित्ताने सलग दुसऱ्यांदा पालिका खजिन्याची चावी महेश लांडगेंच्या भोसरीत राहिली आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in