पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी मानद सचिव नारायणराव तापकीर यांचे निधन 

हवेलीचे कॉंग्रेसचे माजी आमदार दिवंगत अशोकराव कल्याणराव तापकीर पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी मानद सचिव नारायणराव तापकीर यांचे निधन 
Former Honorary Secretary of Pune District Education Board Narayanrao Tapkir passed away

आळंदी (जि. पुणे) : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्‍यातील चऱ्होली बुद्रूक गावचे माजी सरपंच, तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव नारायणराव कल्याणराव तापकीर (वय 86 ) यांचे आज (ता. 10 सप्टेंबर) वृद्धापकाळाने निधन झाले. 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव आणि पुणे मार्केट यार्ड कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. हवेली तालुक्‍याचे कॉंग्रेसचे माजी आमदार दिवंगत अशोकराव कल्याणराव तापकीर पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. त्यांच्या पश्‍चात तीन भाऊ आणि पाच बहिणी असा असा परिवार आहे. 

पुण्याच्या शैक्षणिक चळवळीची हानी :  अजित पवार 

मुंबई : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी मानद सचिव नारायणराव तापकीर यांचं निधन झाल्याची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनाने पुण्याच्या शैक्षणिक चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. सामाजिक, शैक्षणिक चळवळीत तळमळीने कार्य करणारा सच्चा सहकारी मी गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, नारायणराव तापकीर यांनी पुण्याच्या सामाजिक, शैक्षणिक चळवळीत दीर्घकाळ मोलाचे योगदान दिले. पुणे शिक्षण मंडळाचे मानद सचिव म्हणून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. 

त्यांचे बंधू माजी आमदार अशोक तापकीर यांचं काही महिन्यांपूर्वी झालेल्या निधनानंतर आज (ता. 10 सप्टेंबर) नारायणराव तापकीर यांच्या निधनाने तापकीर कुटुंबावर झालेला आघात मोठा आहे. या दु:खातून सावरण्याची शक्ती तापकीर कुटुंबीयांना मिळो. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in