बारणेंच्या मागणीवर अजितदादांकडून आदेश.. बिलाअभावी मृतदेह तीन दिवस अडविणाऱ्या 'मायमर' वर गुन्हा   - fir filed against Mymer medical college administration  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

बारणेंच्या मागणीवर अजितदादांकडून आदेश.. बिलाअभावी मृतदेह तीन दिवस अडविणाऱ्या 'मायमर' वर गुन्हा  

   उत्तम कुटे
शनिवार, 8 मे 2021

मृतदेह बिलाअभावी मायमरच्या कोवीड सेंटरने अडवून ठेवला होता. 

पिंपरी : बिलाअभावी कोरोना मृतदेह तीन दिवस न देणाऱ्या तळेगांव दाभाडे (ता. मावळ,जि. पुणे) येथील मायमर मेडिकल कॉलेजच्या  Mymer medical college प्रशासनाविरोधात आज गुन्हा दाखल झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी याबाबत खासदार श्रीरंग बारणे  Shrirang Barne यांच्या मागणीवर एफआयआर करण्याचे आदेश दिले होते. fir filed against Mymer medical college administration 

'सरकारनामा'ने या घटनेबाबत कालच बातमी दिली होती. उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी (तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे) काही तासात कालच गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली. त्याबाबत सुधीर गणेश लोके (वय २३, रा. मळवली,  मावळ) यांची फिर्याद त्यांनी घेतली आहे. त्यांच्या वडिलांचा कोरोनाने १ मे रोजी म्रुत्यू झाल्यावर मृतदेह बिलाअभावी मायमरच्या कोवीड सेंटरने न देता तो अडवून ठेवला होता. 

शिवसेनेचे खासदार बारणे यांनी ३ मे रोजी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला होता. काल झालेल्या पुणे जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत त्यांनी याप्रकरणी  गुन्हा नोंद करण्याची मागणी  अजितदादांकडे केली होती. याबाबत खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पैशासाठी चुकीचे काम करणाऱ्यांना, तर  शिक्षा झालीच पाहिजे. पण, त्याचबरोबर मृत रुग्णाच्या कोरोना पॉझिटिव्ह  मुलाच्या घरी जाऊन जबाबावर सही घेणाऱ्या महसूलच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. 

हेही वाचा संभाव्य तिस-या  लाटेचा धोका टाळण्यासाठी मुलांसाठी स्वतंत्र्य रुग्णालय 
 
पिंपरी : कोरोनाच्या तिस-या संभाव्य लाटेचा लहान मुलांना असणारा धोका टाळण्यासाठी मुलांकरिता खास स्वतंत्र रुग्णालय  hospital for children तयार करण्याचे आदेश पिंपरीच्या महापौर माई ढोरे Mai Dhore यांनी शुक्रवारी (ता. ७) प्रशासनाला दिले. शहरवासीयांच्या जीविताचा विचार करुन १५ लाख कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस स्वखर्चाने खरेदी करण्याची पालिकेची तयारी आहे. त्यासाठी सरकारची त्वरीत परवानगी देण्याची मागणीही ढोरेंनी केली. महापौर दालनात आयुक्त राजेश पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी ही  मागणी केली. उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अड. नितीन लांडगे, क्रीडा सभापती उत्तम केंदळे, माजी उपमहापौर केशव घोळवे, तुषार हिंगे, नगरसेवक अभिषेक बारणे, तुषार कामठे सीमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे आदी यावेळी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख