परदेशात राहूनही देशवासियांची काळजी : ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या चौधरींनी पिंपरीला दिल्या दोन वैद्यकीय मशीन   - A Engineer In Australia Native Of Pimpri Chinchwad Donated Five Para Monitor | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

परदेशात राहूनही देशवासियांची काळजी : ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या चौधरींनी पिंपरीला दिल्या दोन वैद्यकीय मशीन  

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 13 मे 2021

मूळ शहरातील पण परदेशात असलेल्या नागरिकांनी आपल्या जन्मभूमीला मदत करावी.

पिंपरी  ः पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील कोरोनाची (Corona) वाढती रुग्णसंख्या पाहून मूळ पिंपरी-चिंचवडकर; पण सध्या ऑस्ट्रेलियात अभियंते असलेल्या विजय चौधरी (Vijay Chaudhary) यांनी सव्वा लाख रुपयांची दोन वैद्यकीय मशीन (फाईव्ह पॅरा मॉनिटर, Para Monitor) शहरातील लोकमान्य हॉस्पिटलला आज (ता. १३ मे) भेट दिली. त्यांच्या या दातृत्वाचे शहरात कौतुक होत आहे. (A Engineer In Australia Native Of Pimpri Chinchwad Donated Five Para Monitor)

लोकमान्य हॉस्पिटलला महानगरपालिकेकडून व्हेंटीलेटर बसवून देण्यास मदत करणाऱ्या खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून चौधरी यांनी ही मशीन दिली आहेत. फाउंडेशनचे सचिव रवी नामदे आणि उद्योजक प्रताप बारणे यांनी ती लोकमान्यचे ब्रिजेश शुक्ला व डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्याकडे आज (गुरुवारी) सुपूर्त केली. याव्दारे आयसीयूतील रुग्णांचा रक्तदाब, सॅच्युरेशन, ईसीजी आदी पाच गोष्टी तपासल्या जाऊन त्यावर देखरेख ठेवली जाते, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा : भालकेंचे पुंडलिक वरदे ऽऽ...तर आवताडेंनी घेतले विधानसभेच्या पायरीचे दर्शन
 
यासंदर्भात चौधरी म्हणाले, ‘‘भारतातील आपले बांधव कोरोनाने त्रस्त आहेत. या संकटकाळी आपल्या जन्मभूमीतील नागरिकांसाठी काहीतरी मदत केली पाहिजे. खारीचा वाटा उचलला पाहिजे. त्यासाठी हे पॅरामॉनिटर देण्याचे निश्चित केले, ते कसे द्यायचे हा प्रश्न होता.  खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशन कोरोना काळात चांगले कार्य करत असल्याची माहिती मिळाली आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले. ’’

‘‘या महामारीविरोधात केंद्र, राज्य सरकार ताकदीने लढत आहेत. पण, नागरिकांनाही सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे. मूळ शहरातील पण परदेशात असलेल्या नागरिकांनी आपल्या जन्मभूमीला मदत करावी’’ असे आवाहनही त्यांनी केले.

अशीच भावना व्यक्त करताना ही लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी हातभार लावणे आवश्यक आहे, असे नामदे म्हणाले. परदेशात राहूनही आपल्या शहराशी असलेली नाळ तुटू न देणाऱ्या व संकटात जन्मभूमीतील नागरिकांच्या मदतीला धावलेल्या चौधरींचे त्यांनी आभार मानले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख