पिगॅससबाबत अजित पवार म्हणतात... कुठेतरी पाणी मुरतेय! - Deputy Chief Minister Ajit Pawar, Pimpri-Chinchwad, Pegasus, Central Government, | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

पिगॅससबाबत अजित पवार म्हणतात... कुठेतरी पाणी मुरतेय!

उत्तम कुटे
बुधवार, 21 जुलै 2021

लोकसंख्येच्या बाबतीत आपले राज्य देशात तिसऱ्या क्रमाकांवर असून त्या तुलनेत कोरोना लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिमेत अडथळा येत आहे.

पिंपरी : पिगॅसस या हेरगिरी करणाऱ्या तंत्रज्ञानाव्दारे काही निरपराधही भरडले जात असल्याने त्याविषयी शंका घेण्यास जागा आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आज (ता.२१ जुलै) पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) सांगितले. त्यात कुठेतरी पाणीही मुरतेय, असे सांगत त्यांनी याविषयी व पर्यायाने केंद्र सरकारच्या हेतूविषयीच शंका उपस्थित केली. 

हेही वाचा : गणेश नाईकांची एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दमबाजी

पिंपरी एमआयडीसीतील एका कंपनीच्या तीनचाकी इलेक्ट्रीक वाहन वितरण सेवेचे उद्घाटन केल्यानंतर पवार बोलत होते. पिगॅससबाबत कुणी आदेश दिले, हे जनतेला कळले पाहिजे. देशद्रोही काम होत असेल, तिथे अशी हेरगिरी केली, तर ठीक. पण, त्याआधारे निरपराध सुद्धा भरडले जात आहेत, हे चूक आहे. अशा प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनीही राजकारण आणले नाही पाहिजे, असे ते म्हणाले.  

लोकसंख्येच्या बाबतीत आपले राज्य देशात तिसऱ्या क्रमाकांवर असून त्या तुलनेत कोरोना लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिमेत अडथळा येत आहे. परिणामी नागरिकांना त्रास भोगावा लागतो आहे. ती पुरेशा प्रमाणात मिळाली, तर तो होणार नाही, असे सांगत त्यांनी याबाबत ही लस पुरवणाऱ्या केंद्र सरकारला जबाबदार धरले. सर्वोच्च न्यायालयाने सहकारावर नुकत्याच दिलेल्या निकालावर राज्य आणि केंद्राला आपापले अधिकार मिळाल्याचे दिसून येत आहे, अशी प्राथमिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा : फडणवीसांची कबुली; निवडणूक निकालानंतर अधिकारी इस्त्राईलला गेले पण...

त्याव्दारे सहकार कायद्यात बदल करण्याचा राज्याचा सहकार विभाग व राज्य विधीमंडळाला गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पूर्ण निकाल हाती आल्यानंतरच त्यावर योग्य आणि परिपूर्ण भाष्य करता येईल, हे ही त्यांनी स्पष्ट केले. सचिन वाझे व  प्रकरण-दर्शन घोडावत प्रकरणात आपले नाव घेतले जात असून त्याबाबत चौकशीच्या झालेल्या मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी त्याबाबत अजून तपास सुरू असल्याचे सांगत त्यावर सबंधित तपास यंत्रणा बोलतील, असे सांगितले. मात्र, माझा त्यापैकी कुणाशीही दुरान्वये संबंध नाही. महाराष्ट्र मला 30 वर्षांपासून ओळखतो आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख