Congress Andolan  (16).jpg
Congress Andolan (16).jpg

मोदींचा वाढदिवस बनला राष्ट्रीय बेरोजगार दिवस..

त्यामुळे ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारीचा उच्चांक मोदींच्या काळात झाला.

पिंपरी : देशातील वाढती बेरोजगारी व त्यामुळे होत असलेले तरूणांचे हाल व दुर्दशा पाहता युवक काँग्रेसने (Youth Congress), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा जन्मदिन शुक्रवारी (ता.१७) राष्ट्रीय स्तरावर बेरोजगार दिवस साजरा केला. तर, भाजपने सेवा समर्पण सप्ताह देशपातळीवर सुरु केला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसने पिंपरी येथील डॅा.बाबासाहेब आंबेडकर चौकात केंद्रातील भाजपच्या मोदी सरकार विरोधात “मी बेरोजगार, कोण जबाबदार” हे आंदोलन केले. बेरोजगारीची गंभीर समस्या व त्याचे सामाजिक दुष्परिणाम याबाबत केंद्र सरकारला जाब विचारणारी पत्रके वाटण्यात आली. तर, युवकांकडून प्रतिकात्मक स्वरूपात हातगाडीवर केळी व नारळ विक्री करत, नागरी अपेक्षांबाबत मोदी सरकारने नागरिकांना नैराश्य दिले. याबाबत प्रतिकात्त्मक निषेध नोंदवला.

यावेळी पुणे जिल्हा इंटक अध्यक्ष डॅा. कैलास कदम, युवकचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआयचे शहराध्यक्ष डॅा. वसीम ईनामदार, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव आदी उपस्थित होते.

देशातील युवक हा बेरोजगारीमुळे गुन्हेगारी, जुगाराकडे व शेवटी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्येकडे वळत आहे.  मोदीजींना याचे गांभीर्य कळावे यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे  बनसोडे म्हणाले, "दोन कोटी रोजगार दरवर्षी देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदींनी ७ वर्षातही ते पाळले नाही. उलट होते ते रोजगार गेले. त्यामुळे ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारीचा उच्चांक मोदींच्या काळात झाला" असल्याचेही ते म्हणाले. 

भाजपचे ‘‘सेवा व समर्पण अभियान’

दुसरीकडे मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार, १७ सप्टेंबर  ते ७ ऑक्टोबर दरम्यान सेवा व समर्पण अभियान राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने गरजूंना साहित्य वाटप करण्यात आले. शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ते झाले. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, शहर सरचिटणीस राजू दुर्गे, विजय फुगे आदी उपस्थित होते.

या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून समाजामध्ये सेवाकार्याचे महत्त्व व राष्ट्राप्रती समर्पण भावना जागृत करण्याचा आमचा हेतू असल्याचे आ. लांडगे म्हणाले. शहरातील गरीब वस्ती, अनाथाश्रम, रुग्णालये, वद्धाश्रम याठिकाणी मदत करण्यासह प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लाभार्थींना मोफत रेशन बॅग वाटप करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com