सोशल डिस्टन्सिंग अन् जमावबंदी धुडकावून चंद्रकांतदादांचा कार्यक्रमांचा धूमधडाका!

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमिवर राज्यात सध्या लॅाकडाऊन आहे.
 Chandrakant Patil .jpg
Chandrakant Patil .jpg

पिंपरी : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमिवर राज्यात सध्या लॅाकडाऊन आहे. दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी आहे. मात्र, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून रविवारी (ता. २५ एप्रिल) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्योगनगरीत चार कार्यक्रम घेतले. त्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसले. त्याला ४८ तास उलटून गेल्यानंतरही याप्रकरणी पोलिसांनी स्वता:हून दखल घेतलेली नाही. यामुळे कोरोनाचे निर्बंध हे फक्त सर्वसामान्यांसाठी असून सन्माननीय त्याला अपवाद आहेत, का अशी चर्चा शहरात सुरु आहे.

राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांना दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये बंदी आहे. तसेच जमावबंदीचा आदेशही लागू आहे. तरीही एक नव्हे, तर चार कार्यकम रविवारी शहरात झाले, हे विशेष. त्यावेळी फोटोसाठी मोठी गर्दीही झाली होती. मास्क सर्वांनी घातले होते. मात्र सामाजिक अंतर अजिबात पाळलेले दिसले नाही. यातील माजी महापौर राहूल जाधव यांच्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण आणि रावेत येथील कोविड हॉस्पिटलचे उदघाटन हे कार्यक्रम ऑनलाईन घेता आले असते.

यापूर्वीही शहराच्या महापौर माई ढोरे यांनी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त २२ फेब्रुवारीला आयोजित केलेल्या सौंदर्यवती स्पर्धेत मोठी गर्दी जमविण्यात येऊन सोशल डिस्टन्सिंग तीनतेरा वाजवण्यात आले होते. त्यावेळी मास्क न घातलेल्या अनेकांकडून दंडही वसूल करण्यात आला होता. ही बाब मीडियाने लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी महापौरांवर नाही, तर त्यांच्या मुलावर नंतर गुन्हा दाखल केला. तर, मार्च महिन्यात उपमहापौर निवडीचा जल्लोष पालिका आयुक्तालयातच साजरा करताना कोरोना नियमावलीचे बारा वाजवण्यात आले होते. त्याबद्दलही पोलिसांनी उपमहापौर नाही, तर त्यांच्या मुलाविरुद्धच केस केली होती.

रविवारी पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या विशेष सहकार्याने रावेत येथे उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे उदघाटन केले. याप्रसंगी पाचपेक्षा कितीतरी अधिक मान्यवर उपस्थित होते. अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरला त्यांनी भेट दिली. यावेळी, तर खूप गर्दी झाली होती.

आमदार जगताप आणि त्यांचे बंधू माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून पिंपळेगुरव येथील आयुश्री हॉस्पिटल यांच्या सहकार्याने उभारलेल्या कोविड केअर सेंटरची पाहणी करून तेथील रुग्णांशी पाटील यांनी संवाद साधला. यावेळीही जमावबंदीचा आदेश धुडकाण्यात आला होता. हीच गत भाजपचे नगरसेवक आणि माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकाांच्या लोकार्पणप्रसंगी झाली होती. 

Edited By - Amol Jaybhaye    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com