पिंपरी पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप-राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई सुरु - BJP NCP battle Pimpri Municipal Corporation-mm76 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

पिंपरी पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप-राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई सुरु

उत्तम कुटे
शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021

पवार साहेबांच्या प्रयत्नांमुळे बोपखेलवासियांची त्रासातून मुक्तता होणार आहे, असे ते म्हणाले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील उड्डाणपुलाचे संरक्षण विभागाच्या हद्दीतील काम लष्कराच्या परवानगीअभावी रखडले होते. ती काल (ता. ९) देण्यात आली. त्यावरून श्रेयाचे राजकारण शहरात आज (ता.१०) रंगले. आपल्या पाठपुराव्यामुळे ही परवानगी मिळाल्याचे राष्ट्रवादीतून सांगण्यात आले. तर,आपल्या प्रयत्नांचे हे यश आहे,असा दावा भाजपने केला. पालिका निवडणूकीच्या तोंडावर आतापासून श्रेयाची लढाई भाजप, राष्ट्रवादीत शहरात सुरु झाली आहे. 

माजी संरक्षणमंत्री शरद पवारांच्या माध्यमातून आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे संरक्षण विभागाची ही परवानगी मिळाली आहे,असे शहरातील राष्ट्रवादीचे आमदार (पिंपरी) अण्णा बनसोडे व भोसरीचे माजी आमदार विलास लांडे म्हणाले. पवारसाहेबांच्या प्रयत्नांमुळे बोपखेलवासियांची त्रासातून मुक्तता होणार आहे, असे ते म्हणाले. तर, शहरातील भाजप आमदार (चिंचवड) लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचा प्रतिदावा बोपखेलकर असलेल्या शहराच्या उपमहापौर हिराबाई घुले यांनी केला. प्रत्यक्षात सर्वपक्षीयांनीच ही ज्वलंत समस्या सुटण्याकरिता प्रयत्न केलेले आहेत. 

वाझे, परमबीरसिंह यांचा डायरेक्टर भाजपच  
महिन्याभरापूर्वी लांडे व बनसोडे यांनी दिल्लीत याप्रश्नी पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पवारांनी संरक्षण मंत्री, सचिवांकडे पाठपुरावा करून बोपखेलवासियांसाठी पुलाच्या कामाला परवानगी मिळवून दिली. परवा मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत दोन दिवसांत पुलाला परवानगी मिळेल, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार काल ही अंतिम परवानगी मिळाली,असे लांडे यांनी सांगितले. 

तर, बोपखेलच्या पुलाला संरक्षण विभागाची अंतिम मान्यता हे आमदार जगताप यांच्या पाठपुराव्याचे यश असल्याचे उपमहापौर म्हणाल्या. आमदार जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे संरक्षण विभागाची आवश्यक असलेली अंतिम 'वर्किंग' परवानगी मिळाली. त्यामुळे काही महिन्यात काम पूर्ण करुन बोपखेलवासीयांसाठी पूल खुला करण्याचे नियोजन असल्याचे घुले यांनी सांगितले. त्यांनी जगताप व केंद्र सरकारचे बोपखेलवासीयांच्या वतीने आभारही मानले. बोपखेलकरांचा जिव्हाळ्याचा हा प्रश्न सोडविण्यात यश आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 

बोपखेलकरांचे दळणवळणाचे एकमेव साधन असलेला दापोडी येथून सीएमई हद्दीतून जाणारा रस्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मे २०१५  रोजी बंद करण्यात आला. त्यामुळे बोपखेलकरांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा आतापर्यंत घालावा लागत होता. त्यांच्या सोईसाठी या जवळच्या रस्त्याचे व पूलाचे काम ४ जानेवारी २०१९ मध्ये सुरू झाले.

महापालिकेने वेगात नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले. परंतु, संरक्षण विभागाच्या जागेवरील काम बाकी होते. ते काम चालू करण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी आवश्यक होती. या परवानगीमुळे ते थांबले होते. अखेर ती मिळाल्याने पुलाचे काम करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मात्र, ती सशर्त असून त्यासाठी लष्कराने तब्बल ४० अटी पालिकेला घातल्या आहेत. त्यात या मार्गाचा वापर करणाऱ्यांची पूर्वीसारखी तपासणी तसेच दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक अशा अटींचा समावेश आहे. तसेच पूल व जो़डरस्त्याकरिता दिलेल्या १६  हजार १२२ चौरस मीटर जागेच्या बदल्यात तेवढीच पर्यायी जागा संरक्षण विभागाने घेतली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख