कोरोना वाढल्याने पिंपरी चिंचवडचे कारभारी चिंतेत - BJP MLA Laxman Jagtap Worried about Rising Cases of Corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

कोरोना वाढल्याने पिंपरी चिंचवडचे कारभारी चिंतेत

उत्तम कुटे
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने सावध व्हा आणि काळजी घ्या,असे आवाहन शहराचे कारभारी आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवडकरांना चिंता केले आहे. फिरायला न जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

 

पिंपरी : कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने सावध व्हा आणि काळजी घ्या,असे आवाहन शहराचे कारभारी आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवडकरांना चिंता केले आहे. फिरायला न जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

दरदिवशी दीड हजारावर गेलेली शहरातील कोरोना रुग्ण संख्या ही शंभराच्या आत आली होती.मात्र गेल्या काही दिवसांपासून तिने पुन्हा उचल खाल्ली असून ती दुप्पट झाली आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या भीतीने कारभारी आणि प्रशासन सतर्क झाले आहे.ही रिस्क कमी करणे नागरिकांच्याच हातात असल्याने त्यांनी प्रशासनाला सातत्याने सहकार्याची भूमिका दाखवायला हवी, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे. 

मास्क न लावता फिरणे, सुरक्षित अंतरांचे निकष न पाळणे, वेळीच तपासण्या न करणे यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा उचल खात आहे,असे ते म्हणाले. कोरोनाविरोधातील लढाईसाठी महापालिकेची वैद्यकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. परंतु, नागरिकांचीही त्यांना साथ मिळणे ही तेवढीच महत्त्वाची बाब आहे. म्हणून विनाकारण घराबाहेर पडू नका, बाजारात, दुकानात, मॉलमध्ये गर्दी करणे टाळा, मास्क वापरा असे त्यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख