भाजपची ४० वर्षे सेवा केली, हेच आमचे चुकले का?

होर्डिंग्सवरलोकनेते भाजपचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्व. अंकुशराव लांडगे आणि वडिलांचे फोटो आहेत.
Ravi Landage .jpg
Ravi Landage .jpg

पिंपरी : चाळीस वर्षासून आमचे कुटुंब भाजपची सेवा करतंय, हे आमच्या कुटंबाचे चुकले का? गोरगरिबांसाठी बांधलेल्या रुग्णालयाच्या खासगीकरणाला मी विरोध केला, हे माझे चुकले का? माझ्या वडिलांनी शहरात जनता पक्षाचा पाया रोवला, माझ्या चुलत्यांनी पक्षाचा विस्तार केला आणि मी ही एकनिष्ठ राहिलो, हे आमच्या कुटुंबांच चुकले का? सोईचे नाही, तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केले. हे माझे चुकले का? अशी प्रश्नांची तोफ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी डावललेले भोसरीतून बिनविरोध निवडून आलेले भाजपचे एकनिष्ठ नगरसेवक रवी लांडगे यांनी केली आहे. 

शहराचे कारभारी आणि भाजपचे आमदार असलेल्या संपूर्ण भोसरी मतदारसंघात त्यांनी असे भलेमोठे चाळीसेक होर्डिंग लावल्याने शहरभर तो चर्चेचा विषय ठरला आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी अध्यक्ष निवडीत ऐनवेळी डावलण्यात आल्याने त्यांनी तडकाफडकी स्थायी सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला. त्याच दिवशी पत्रकारपरिषद घेऊन त्यांनी जुन्या एकनिष्ठ भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण सुरु असल्याचा आरोप केला होता.

गेल्या चार वर्षात एकही पद न मिळाल्याने स्थायीचे अध्यक्षपद देऊ, असा शब्द त्यांना देण्यात आला होता. ज्यांच्या कारकिर्दीत भोसरी हा भाजपचा बालेकिल्ला झाला ते भाजपचे दिवगंत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे ते पुतणे आहेत. त्यांचे हे चुलते आणि वडिल बाबासाहेब यांनी शहरात भाजप रुजविलीच नाही, तर प्रतिकूल परिस्थितीत वाढवलीही आहे. त्यामुळे स्थायीसाठी डावलले गेल्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठी आणि शहर कारभाऱ्यांना विचारणा करणारे हे फलक लावून पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. 

त्यावर लोकनेते भाजपचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्व. अंकुशराव लांडगे आणि वडिलांचे फोटो आहेत. वुई सपोर्ट रवी लांडगे असा मजकूर या फ्लेक्सवर आहे. याव्दारे त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची दादच पक्षाच्या वरिष्ठांकडे मागितल्याची चर्चा भोसरीतच नाही, तर संपूर्ण शहरात रंगली आहे. दरम्यान, त्यांचा राजीनामा महापौरांनी स्वीकारलेला नाही. तसेच ते आतापर्यंतच्या दोन्ही स्थायीच्या समितीला गैरहजर राहिलेले आहेत.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com