भाजप नगरसेविकेचा पती जुगाराच्या गुन्ह्यात आरोपी  - BJP corporator husband accused of gambling Pramod Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

भाजप नगरसेविकेचा पती जुगाराच्या गुन्ह्यात आरोपी 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 मार्च 2021

भाजपच्या नगरसेविका मनिषा पवार यांचे पती प्रमोद पवार यांच्याविरुद्ध  जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सभापती आणि भाजपच्या नगरसेविका मनिषा पवार यांचे पती प्रमोद पवार यांच्याविरुद्ध पिंपरी-चिंचवडमधील वाकड पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर, महापालिका निवडणूक जवळ आल्याने राजकीय आकसातून या गुन्ह्यात पोलिसांनी गोवल्याचा दावा प्रमोद पवार यांनी केला आहे. तसेच गुन्हा घडला त्यावेळी आपण सपत्नीक लग्नाला बाहेर गेलो होतो, असे ते म्हणाले.

दरम्यान, वाकड पोलिस ही कारवाई करायला गेलेच नव्हते. तर, शहरात कोरोनाने पुन्हा उचल खाल्याने विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध ते गेल्या रविवारी (ता. ७) कारवाई करीत होते. त्यावेळी त्यांना पडवळनगर, थेरगाव
येथे एका दुमजली घरात जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यावरून ते तेथे गेले असता तेथे घराला बाहेरून कुलूप होते. मात्र, आत जुगार सुरु होता. पोलिस आल्याचे पाहून खिडकीतून शेजारच्या घराच्या छतावर

उड्या टाकून तिघे पळाले. मात्र चौघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यात भाड्याने राहत असलेला या घरातील भाडेकरूही होता. त्यांच्याकडून पत्याचा कॅट आणि थोडी रोकड पोलिसांनी जप्त केली. अटक केलेल्या चौकडीला हा गुन्हा जामीनपात्र असल्याने पोलिस ठाण्यातच गेटजामीन झाला. न्यायालयातही अशा आरोपींची दंड भरून सुटका होते. पकडलेल्या एका आरोपीने प्रमोद पवार हे सुद्धा जुगार खेळत असल्याचे सांगितल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आल्याचे तपासाधिकारी निमगिरे यांनी सांगितले. त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींसारखी त्यांच्याविरुद्धही कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर, आपण जुगार खेळतच नव्हतो. पोलिसांनी धाड मारली तेव्हाही आपण तेथे नव्हतो. कारण पत्नीसह मी एका लग्नाला बाहेर गेलो होतो, असे प्रमोद पवार यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. यामुळे याबाबत आता वकिलांशीच बोलून पुढील पाऊले उचलणार पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : खासदार डेलकर आत्महत्याप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा  

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत 22 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. मोहन डेलकर यांच्या मृत्यूप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेलकर मुंबईतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडले होते. डेलकर यांनी त्यांच्या लेटरहेडवर 15 पानांची सुसाईट लिहिली होती.  डेलकर आत्महत्या प्रकरणात ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, संदीप सिंग, अपूर्व शर्मा, मनस्वी जैन, मनोज पटेल, रोहित यादव, फत्तेसिंग चौहान, दिलीप पटेलस शरद दराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख