भाजपच्या नगरसेवकाने परस्पर विकली सरकारी जागा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लांडगे यांनी मूळ मालक नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर जमीनीचा व्यवहार केला आहे.
भाजपच्या नगरसेवकाने परस्पर विकली सरकारी जागा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Rajendra Landage .jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजेंद्र लांडगे (Rajendra Landge) यांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा परस्पर विक्री केल्याचा आरोप लांडगेंवर आहे. लांडगे यांच्यासह एका जमीन खरेदीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे., तर दुसऱ्या एकाचा शोध सुरु आहे. (BJP corporator arrested for selling Pimpri-Chinchwad authority land)

नगरसेवक राजेंद्र लांडगे (वय ४२ रा. भोसरी) यांच्यासह मनोज महेंद्र शर्मा (वय-३८ रा. भगत वस्ती, हनुमान नगर, भोसरी) याला अटक केली आहे. रविकांत ठाकूर (वय-४०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता भुजबळ (वय-३७) यांनी भोसरी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. 

लांडगे यांनी मूळ मालक नसतानाही बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर जमीनीचा व्यवहार केला आहे. त्यासाठी त्यांनी १५ लाख ८० हजार रुपये उकळे आहेत. लांडगे हे भोसरीतील धावडे, भगतवस्ती प्रभागातून निवडून आले आहेत. ते स्थायी समितीचे माजी सदस्य, शहर सुधारणा समितीचे माजी होते. तर सध्या ते महापालिकेच्या क प्रभागाचे अध्यक्ष आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची इंद्रायणीनगर येथील जागा शर्मा आणि ठाकूरला १५ लाख ८० हजार रुपयांना विकली आहे. जागेवर अतिक्रमण करुन शर्मा आणि ठाकूर यांनी १८७२ चौ. फुट बांधकाम केले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मिळकर कर पावती आणि वीज कनेक्शनही घेतले आहे.

भोसरी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, प्राधिकरणाची जागा विकून नगरसेवकाने पैसे लाटल्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.  

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in