भाजपच्या नगरसेविका अर्चना बारणे यांचे डेंगीमुळे निधन - BJP corporator Archana Barne dies of dengue | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या नगरसेविका अर्चना बारणे यांचे डेंगीमुळे निधन

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 जुलै 2021

अशा तीन नगरसेवकांचे बळी गेले आहेत.

पिंपरी  ः पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अर्चना तानाजी बारणे (वय ३९, रा. थेरगाव) यांचे डेंगीमुळे मंगळवारी (ता. १३ जुलै) सायंकाळी निधन झाले. या टर्ममधील अकाली निधन झालेल्या त्या महापालिकेतील चौथ्या नगरसेविका आहेत. यापूर्वी कोरोनाने राष्ट्रवादीचे दोन, तर भाजपचा एक अशा तीन नगरसेवकांचे बळी गेले आहेत. (BJP corporator Archana Barne dies of dengue)

गेल्या वर्षी कोरोनामुळे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचे प्रथम निधन झाले. त्यानंतर त्याच पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख व त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण उंडे यांचा बळी कोरोनाने गेला होता.

हेही वाचा : पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या बदलीचा असा रचला प्लॅन

भाजपच्या नगरसेविका बारणे यांचे आज (ता. १३ जुलै) डेंगीमुळे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्या २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक २३ (थेरगाव गावठाण) मधून प्रथमच निवडून आल्या होत्या. स्थायी समितीचे सदस्य आणि  प्रभाग समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

हेही वाचा  ः देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण आज पुन्हा सापडला पॉझिटिव्ह
 
नवी दिल्ली : चीनमधील वुहान प्रांतात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर तेथील अनेक जण भारतात परतले. त्यामुळं भारतातील कोरोनाचा धोका वाढला होता. जानेवारी महिन्यातील तीन आठवडे उलटून गेल्यानंतर भारतात कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. पण महिन्याच्या अखेरीस 30 जानेवारी 2020 रोजी एका रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेने दिला अन् संपूर्ण हादरून गेला. हाच रुग्ण पुन्हा कोरोनाबाधित झाल्याचे मंगळवारी (ता. 13) आलेल्या अहवालात स्पष्ट झालं. 

केरळमधील थ्रिसूर जिल्ह्यातील 21 वर्षांची ही तरूणी आहे. तिचा आरटी-पीसीआर अहवाल पॅाझिटिव्ह आला असून सध्या कोणतीही लक्षणे नाहीत, अशी माहिती जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॅा. के. जे. रीना यांनी दिली. ही तरूणी भारतातील पहिली कोरोनाबाधित रुग्ण होती. सुमारे 18 महिन्यांच्या कालावधीनंतर तिला पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पहिल्यांदा ती बाधित आढळली तेव्हा कोरडा खोकला हे लक्षण होतं. 

ही तरूणी चीनमधील वुहान शहरात वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर ती 23 जानेवारी 2020 रोजी केरळमध्ये परतली होती. तिला 26 तारखेपर्यंत कोणतंही लक्षण नव्हतं. पण 27 तारखेला सकाळी कोरडा खोकला आणि घसा दुखत असल्याचे तिला जाणवले. त्याच दिवशी तिला थ्रिसूर येथील सरकारी रुग्णालयात बोलवून घेण्यात आले. तिची सर्व तपासणी केल्यानंतर अन्य कोणताही त्रास नसल्याचे स्पष्ट झाले.

या तरूणीला तातडीने विलगीकरण कक्षात हलवण्यात आले. तिच्या घशातील नमूना घेऊन NIV मध्ये पाठवण्यात आला. त्यावेळी केवळ पुण्यातच तपासणी केली जात होती. आरटी-पीसीआर चाचणीत तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. हा अहवाल 30 जानेवारी रोजी आला. तिला औषधोपचार सुरू केल्यानंतर तीनच दिवसांत तिची लक्षणे कमी झाली. ता. 3 फेब्रुवारी रोजी तिला कोणतंही लक्षणं नव्हतं.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख