उद्योगनगरीच्या उपमहापौरपदी उसतोड कामगाराचा मुलगा... 

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी केशव घोळवे यांचे नाव निश्चीत झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक असलेल्या घोळवेंचे नाव सूचवून धूर्त खेळी केली आहे.
_केशव घोळवे 2.jpg
_केशव घोळवे 2.jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी प्रथमच निवडून आलेले जुने भाजपचे कार्यकर्ते केशव घोळवे यांचे नाव निश्चीत झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक असलेल्या घोळवेंचे नाव सूचवून धूर्त खेळी केली आहे. यामुळे या पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या शहर कारभाऱ्यांच्या समर्थकांचा हिरमोड झाला आहे.

उपमहापौरपदासाठी येत्या शुक्रवारी (ता.६) निवडणूक होणार आहे. भाजपचे पालिकेतील बहूमत पाहता त्यांचाच उपमहापौर होणार हे स्पष्ट आहे. फक्त तो भोसरीचा होणार अशी चर्चा होती. या पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. त्यासाठी चंद्रकांतदादांनी शहराचे कारभारी व पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप (चिंचवड) आणि महेश लांडगे (भोसरी) यांच्याशी चर्चा करून घोळवे यांचे नाव निश्चीत केले.

घोळवे हे मावळते उपमहापौर तुषार हिंगे यांच्याप्रमाणेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. तर, महापौर माई ढोरे या लक्ष्मणभाऊंच्या मतदारसंघातील असून त्यांच्या पाठीराख्या आहेत. तर, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे हे महेशदादांचे  समर्थक आहेत. तर, आता उपमहापौरपदासाठी जुन्या एकनिष्ठ भाजपा कार्यकर्त्याला संधी दिल्याने तीन महत्वाच्या पदांचे वाटप शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात समसमान झाले आहे.

घोळवे हे उसतोड कामगारांचा मुलगा आहेत. भाजपच्या कामगार आघाडीचे ते प्रदेश सरचिटणीस, तर राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे ते सदस्य आहेत. शहरातील एका खासगी कंपनीत ते कामाला होते. २०१७ ला ते प्रथमच नगरसेवक झाले.

फेब्रुवारी २०१७ ला पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीची १५ वर्षाची मक्तेदारी मोडीत काढून भाजप प्रथमच सत्तेत आली. प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून त्यांनी पदाधिकारी कालावधी निश्चीत केला.त्यानुसार आतापर्यंत तीन उपममहापौर झाले आहेत.त्या प्रत्येकवेळी या पदासाठी कसलीही चुरस वा रस्सीखेच दिसून आली नाही. नुकतेच राजीनामा दिलेले उपमहापौर तुषार हिंगे यांना,तर ते क्रीडा समिती सभापती असतानाही या पदाची लॉटरी लागली. मात्र, त्यांनीच या पदाला मोठे वलय आपल्या छोट्याशा ठरवून दिलेल्या कारकिर्दीत प्राप्त करून दिले. 


हेही वाचा : कोरोनामुळे विकासकामांना ब्रेक; भांडवली खर्च आता कोरानावर
 
पिंपरी : कोरोना महामारीमुळे श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकाही जेरीस आली आहे. तिला आपल्या विकासकामांना तूर्त काहीसा ब्रेक लावावा लागला आहे. कारण त्यावर चालू वर्षाच्या (२०२०-२१)बजेटमध्ये करण्यात आलेली ७८ कोटी रुपयांची तरतूद आता कोरोनावर खर्च होणार आहे. त्यासाठी ही भांडवली तरतूद कोरोना निधी म्हणून वर्ग करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. परिणामी  मंजूर होऊन बजेमध्ये आर्थिक तरतूदही झालेली काही विकासकामे आता होणार नाहीत.किमान पुढील पाच महिने (मार्च २०२१ अखेर) काही कमी महत्वाची व कमी तातडीची विकासकामे पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाहीत.तर, त्यानंतरच्या वर्षात (२०२२) पालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे.त्यामुळे या कामासाठी पु्न्हा तरतूद करण्याची अखरेची संधी या टर्मच्या शेवटच्या आगामी बजेटमध्ये राहणार आहे.त्यामुळे आपापल्या प्रभागातील रख़डलेल्या या कामांसाठी सबंधित नगरसेवकांना मोठी धडपड करावी लागणार आहे.
  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com