बनसोडेंनी महापालिकेला 41 लाख दिले; जगताप, लांडगेंनी किती निधी दिला? 

पिंपरी चिंचवड शहरासाठी कोणी किती निधी आणला व दिला यावरून महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांच्यात संदोपसुंदी सुरू आहे.
बनसोडेंनी महापालिकेला 41 लाख दिले; जगताप, लांडगेंनी किती निधी दिला? 
Bansode gave Rs 41 lakh to the Municipal Corporation; Jagtap, Landge's how much did fund?

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरासाठी कोणी किती निधी आणला व दिला यावरून महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांच्यात संदोपसुंदी सुरू आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर निधीवरून आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. 

गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शहरात आले होते. त्यांनी अजित पवार यांच्यावर टिका केली होती. प्रत्युत्तरादाखल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे व कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पाटील यांच्यावर आरोप केले. त्याला भाजपच्या महापौर उषा ढोरे व महापालिका सभागृह नेते नामदेव ढाके यांनी उत्तर दिले. 

त्यानंतर राज्य सरकारने महापालिकेला सतराशे कोटी रुपये दिल्याचा दावा वाघेरे व शितोळे यांनी केला होता. मात्र, तो खंडित करीत ढोरे व ढाके यांनी अवघे दीड कोटी रुपये सरकारने दिल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले होते. 

आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिकेला 41 लाख 50 हजार रुपये दिले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही आमदारांनी किती निधी दिला, हे जाहीर करावे, असे आव्हान वाघेरे व शितोळे यांनी दिले आहे. राज्य सरकारने महापालिकेला 1700 कोटी रुपयांच्या खर्चासह दोन कोटी 15 लाख आणि खासगी बॅंकेच्या सीएसआर फंडातून 40 लाख रुपयांचा निधी दिल्याचा दावाही त्यांनी केला. 

महापौर उषा ढोरे आणि महापालिकेतील सभागृह नेते नामदेव ढाके यांनी आपले ज्ञान तपासून पहावे. शहरातील कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून द्यावेत. पिंपरी चिंचवड शहरात पाच हजार बेडची स्वतंत्र व्यवस्था करावी, कंपन्यांचे शेड तात्पुरत्या रुग्णालयांसाठी वापरण्यात यावे आणि केंद्र सरकारकडून जीएसटीचा परतावा निधी तातडीने आणावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भाजपच्या नेत्यांना करण्यात आले आहे. 


हेही वाचा : सोलापूरच्या विमानतळासाठी अजिदादांकडून 50 कोटींचा निधी मंजूर 

मुंबई : सोलापूर शहरालगतच्या बोरामणी विमानतळासाठी 34 हेक्‍टर खासगी जमिनीच्या संपादनासाठी 50 कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता. 15 सप्टेंबर) दिले. तसेच, विमानतळासाठी आवश्‍यक असणाऱ्या वन विभागाच्या 32 हेक्‍टर जमिनीवरील वनीकरणाचा शिक्का काढण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात सोलापूरच्या बोरामणी विमानतळाच्या प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष बैठक पार पडली. 

या वेळी सोलापूरचे पालकमंत्री तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार प्रणिती शिंदे व अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

सोलापूर शहरात होटगी येथे सद्य स्थितीत विमानतळ आहे. मात्र, या विमानतळाचा वापर सध्या नॉन शेड्यूल फ्लाईट (अनुसूची नसलेली विमान उड्डाणे) करिता करण्यात येत आहे. परंतु हे विमानतळ छोटे असल्यामुळे "ए-320' व त्या प्रकारच्या विमानांकरीता उपयुक्त नाही. तसेच, हे विमानतळ शहरात असल्याने विमानतळानजिक असलेले साखर कारखाने व नागरी वस्तीमुळे या विमानतळाचा विस्तार करणे शक्‍य नसल्याचे भारतीय विमान प्राधिकरणाने या पूर्वीच स्पष्ट केले आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in