गुन्हेगारांचे धाडस भलतेच वाढले; पोलिसावरच खूनी हल्ला - Attack on police in Pimpri-Chinchwad-arj90 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

गुन्हेगारांचे धाडस भलतेच वाढले; पोलिसावरच खूनी हल्ला

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 जुलै 2021

मंगळवारीच दिघीजवळ भोसरी येथे पहाटे एका तरुणाचा निर्घूण खून झाला होता.

पिंपरी : एका गुन्ह्यात पूर्वी पकडल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या साथीदारांसह एका पोलिसावर (Police) खूनी हल्ला केला. गुन्हेगारांचे धाडस वाढल्याचे व पोलिसांचा वचक कमी झाल्याचे दर्शवणारी ही घटना मंगळवारी (ता.२७) रात्री पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) दिघी येथे घडली. दरम्यान, हा हल्ला करणारा गुन्हेगार तरुण व त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी लगेच अटक केली, असून बाकीच्या सातजणांचा शोध सुरु आहे. (Attack on police in Pimpri-Chinchwad) 

हेही वाचा : त्यांनी चक्क पाच लाखांच्या नोटा कचऱ्यात फेकल्या!

मंगळवारीच दिघीजवळ भोसरी येथे पहाटे एका तरुणाचा निर्घूण खून झाला होता. तो पोलिसांनी लगेचच उघडकीस आणून त्यात कुप्रसिद्ध गोल्डमॅन दत्ता फुगेचा मुलगा शुभम व त्याच्या साथीदाराला अटक केली होती. त्यानंतर काही तासांत हा खूनी हल्ला व तो ही थेट पोलिसावर झाल्याने भोसरी व परिसरातील गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भोसरी एमआयडीसी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे भोसरी पोलिस ठाण्याचे विभाजन करून भोसरी एमआयडीसी हे स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्यात आले आहे. त्यानंतरही एमआयडीसी व पोलिस ठाण्यातील गुन्हेगारीचा आलेख कायम आहे.

अनिकेत हेमराज वाणी (वय २१, रा. भोसरी) आणि सुरज खिलारे अशी अटक हल्लेखोरांची नावे आहेत. तर, अनिल चव्हाण, गणेश साबळे, राहूल आघाम, भगत ऊर्फ धर्मेशसिंग, राहूल जाधव व इतर दोघांचा शोध सुरु असल्याचे दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांनी 'सरकारनामा'ला सांगितले. परमेश्वर तुकाराम सोनके (वय ४१, रा. दिघी पोलिस वसाहत) असे या घटनेत जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. ते पुणे पोलिस आयुक्तालयातील चंदननगर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असून सध्या निलंबित आहे. पूर्वी ते दिघी पोलिस ठाण्यात असताना त्यांनी एका गुन्ह्यात अनिकेतला अटक केली होती. 

हेही वाचा : राज ठाकरेंचा तीन दिवस पुण्यात मुक्काम; पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेणार

त्याचा राग मनात धरून त्याने आपल्या वरील साथीदारांच्या मदतीने सोनके यांचा पाठलाग करून त्यांच्या मोटारीवर दगडांचा वर्षाव केला. त्यात ते जखमी झाले. तसेच मोटारीचेही मोठे नुकसान झाले आहे. सोनके हे आपल्या मित्राच्या बहिणीचा साखरपुडा ठरवण्यासाठी चालले असताना वरील टोळके त्यांना रस्त्यात आरडाओरडा करताना दिसले. म्हणून त्यांना समजावत ते पुढे निघून गेले. यानंतर या टोळक्याने त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मोटारीवर हल्ला केला. तसेच त्यांना मोठ्याने शिवीगाळ करीत दहशत माजवत ते निघून गेले होते.

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख