पिंपरीतील 'हा' परिसर आजपासून पाचदिवस बंद

शगून चौक, कराची चौक, साई चौक, आर्य समाज चौक, गेलार्ड चौक, माता रमाबाई आंबेडकर चौक, डिलक्स चौक, संत गाडगे महाराज चौक, मेन बाजार लेन, रिव्हर रोड, रेल्वे स्टेशन रोड आदी परिसराचा समावेश होतो.
पिंपरीतील 'हा' परिसर आजपासून पाचदिवस बंद
cz

पिंपरी : पिंपरी कॅम्प नजिकच्या भाटनगर, बौद्धनगर व वैष्णव देवी मंदिर परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे हे परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. सोशल डिस्टंसिंग व सम-विषम तारखेनुसार कॅम्पातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, याकडे व्यापा-यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संपूर्ण कॅम्प परिसर 31 हे पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज दिला.
 

पिंपरी कॅम्प परिसरात शगून चौक, कराची चौक, साई चौक, आर्य समाज चौक, गेलार्ड चौक, माता रमाबाई आंबेडकर चौक, डिलक्स चौक, संत गाडगे महाराज चौक, मेन बाजार लेन, रिव्हर रोड, रेल्वे स्टेशन रोड आदी परिसराचा समावेश होतो. 

सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करावे, सम - विषम तारखेनुसार दुकाने सुरू ठेवावे, गर्दी टाळावी या अटीनुसार पिंपरी कॅम्पातील दुकाने उघडण्यास आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी परवानगी दिली होती. मात्र, कोणीही नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे 31 मे पर्यंत पिंपरी कॅम्प बंद ठेवण्यात येत आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी आदेशात म्हटले आहे.

पिंपरी कॅम्प ही पिंपरी चिंचवड शहरासह लगतच्या खेड तालुक्यातील चाकण, आळंदी, धानोरे, च-होली, केडगाव, चिंबळी, महाळुंगे, निघोजेसह देहू, देहूरोड, सोमाटणे, हिंजवडी, माण, मारुंजी, जांभे, कासारसाई आदी गावांसाठी मोठी बाजारपेठ आहे. अनेक नागरिक येथे खरेदी साठी येत असतात. दोन दिवसांपूर्वी सुरू झालेली बाजारपेठ पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहे. ती पुन्हा सुरू होण्यासाठी आणखी पाच दिवस वाट पहावी लागणार आहे.


ही बातमी पण वाचा : राज्यात  2091 नवीन रुग्णांचे निदान

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 2091 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 36 हजार 4 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज 1168 रुग्ण बरे होवून घरी गेले असून आतापर्यंत 16 हजार 954 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आत्तापर्यंतच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या 54 हजार 758 एवढी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 90 हजार 170 नमुन्यांपैकी 54 हजार 758 जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 67 हजार 622 लोक होम रंटाईनमध्ये असून 35 हजार 200 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 97 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या 1792 झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी 35 मृत्यू हे मागील दोन दिवसातील आहेत. तर उर्वरित दोन मृत्यू हे 17 एप्रिल ते 23 मे या कालावधीतील आहेत.  या कालावधीतील 62 मृत्यूपैकी मुंबईचे 19, ठाण्याचे 15, कल्याण-डोंबीवलीचे 9, सोलापूरचे 6, मिरा-भाईंदरचे 5, उल्हासनगरचे 3, मालेगाव मधील 3 तर पुण्यातील एक आणि औंरगाबादमधील 1 मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in