कला दिग्दर्शक साप्ते आत्महत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक  - another arrested director rajesh sapte suicide case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

कला दिग्दर्शक साप्ते आत्महत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

मौर्या, श्रीवास्तव, विश्वकर्मा यांच्या छळामुळे आत्महत्या करीत असल्याचे साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते

पिंपरीः कलादिग्दर्शक राजेश साप्ते rajesh sapte यांच्या आत्महत्येप्रकरणी suicide case मुख्य आरोपी राकेश सत्यनारायण मौर्यासह (वय ४६,रा. कांदिवली पूर्व,मुंबई) आणखी एकाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजीनगर, पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मुंबईहून आलेल्या मौर्याला पोलिसांनी काल (ता.१५) पिंपरीत सापळा लावून पकडले. another arrested director rajesh sapte suicide case

दिपक उत्तम खरात (वय ३७, रा, गोरेगाव पूर्व, मुंबई) या दुसऱ्या आरोपीच्या वाकड पोलिसांनी बुधवारी (ता. १४) मुसक्या  आवळल्या. तो ज्युनिअर आर्टिस्ट को ऑर्डिनेटर आहे. तर, मौर्या हा गोरेगाव (पूर्व), मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील (फिल्मसिटी) फिल्म स्टुडिओ अँन्ड अलाईड मजदूर युनियनचा खजिनदार आहे.

मौर्या व इतर आरोपींच्या छळाला,आर्थिक शोषणाला कंटाळून साप्ते यांनी पिंपरी चिंचवडमधील ताथवडे येथील घरी ता. ३ जुलैला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे फिल्मसिटीत प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेत राज्याचे ग्रुहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जातीने लक्ष घातले होते. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे व खंडणी उकळल्याचा गुन्हा पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेला आहे. 

मौर्या, श्रीवास्तव, विश्वकर्मा यांच्या छळामुळे आत्महत्या करीत असल्याचे साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सात पानी पत्रात (सुईसाईड नोट) म्हटले होते. आरोपींना कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी त्यात केली होती. गेल्या तीन वर्षापासून आरोपी साप्तेंना त्रास देत होते. त्यांच्या सेटवर जाऊन पैशाची मागणी करीत होते. ते दिले नाही, तर त्यांचे काम बंद पाडत होते. प्रत्येक प्रोजेक्टमागे त्यांनी एक लाख रुपये मागितले होते. सेटवर व्यवस्थित काम करून देण्यासाठी व त्याकरिता लागणाऱ्या कामगारांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याकरीता दहा लाख रुपये मागून अडीच लाख रुपये घेतलेही होते. त्यानंतरही साप्तेंचा छळ आरोपींकडून सुरुच होता. त्याला कंटाळून अखेर त्यांनी आत्महत्या केली होती.

वारकरी आतंकवादी आहेत काय? 
पिंपरी : ''पालखी सोहळ्यावर निर्बंध घालण्याचे जे काम मुघल आणि इंग्रजांनाही जमले नाही, ते महाविकास आघाडी सरकारने करुन दाखविले आहे,'' अशी जळजळीत टिका विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र, गोवा क्षेत्रमंत्री शंकर गायकर यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख