लसीकरणासाठी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी  दिले २५ लाख रूपये.. - Anna Bansode gave 25 lac from his mla fund for covid vaxin  | Politics Marathi News - Sarkarnama

लसीकरणासाठी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंनी  दिले २५ लाख रूपये..

  उत्तम कुटे
शनिवार, 8 मे 2021

लसीच्या खरेदीसाठी अण्णा बनसोडे यांनी आपल्या आमदार निधीतून २५ लाख रुपये  दिले.

पिंपरी : कोरोना प्रतिबंधक लसीच्या खरेदीसाठी पिंपरीचे राष्ट्रवादीचे ncp आमदार अण्णा बनसोडे Anna Bansode यांनी आपल्या आमदार निधीतून २५ लाख रुपये काल (ता.७)  दिले. ही लस आपल्या मतदारसंघातील नागरिकांना द्यावी, याकरीता त्यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख Rajesh Deshmukhयांना पत्र दिले. लसीकरणासाठी आमदार निधी देणारे ते शहरातील पहिलेच आमदार आहेत. Anna Bansode gave 25 lac from his mla fund for covid vaxin 

निवडणूक संपली..मैत्री जपली..'गोकुळ'चे तीन संचालक पुन्हा नव्याने भेटले... 

मार्च महिन्यात बनसोडेंनी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सिटीस्कॅन यंत्र बसविण्यासाठी सव्वा कोट रुपये आपल्या आमदार निधीतून दिले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या सिटीस्कँन चाचण्या आता मोफत होणार आहेत. त्यांना आतापर्यंत बाराशे ते पाच हजार रुपये शुल्क त्यासाठी मोजावे लागत होते. याव्दारे HRCT SCORE किती आहे, हे कळते. त्यानुसार पुढील उपचारांची दिशा डॉक्टरांकडून ठरवली जाते. 

कोरोनाची प्रतिबंधक लस उपलब्ध होत नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला सध्या ब्रेक लागलेला आहे. बहूतांश लसीकरण केंद्रे बंद आहेत. १८ ते ४४ वयोगटात आहेत ती टोकन स्वरुपात सुरु आहेत. तेथे ऑनलाईन नोंदणी केलेल्या काही शेकडोजणांनाच  लस दिली जात आहे. १८ ते ४४ वयोगटाचे हे लसीकरण १ मे ला सुरु झाल्यावर लस व मनुष्यबळाचाही प्रश्न उभा राहण्याची भीती बनसोडे यांनी त्याअगोदर आठ दिवस वर्तवली होती. हा प्रश्न उभा राहणार असल्याने त्यांनी या मोहिमेचे योग्य नियोजन करण्याची सूचना पालिका आय़ुक्त राजेश पाटील यांना २३ एप्रिलला केली होती. ती १ मे लाच शंभर टक्के खरी ठरली. कारण पुरेशा लसीअभावी त्यादिवशी १८ ते ४४ चे लसीकरण सुरु, तर झाले. मात्र ४५ वर्षावरील ते बंद पडले. म्हणून आता आमदार बनसोडेंनी या समस्येवर उतारा म्हणून लस खरेदीसाठी  २५ लाख रुपये दिले आहेत. 

बनसोडे म्हणाले, माझा मतदारसंघ झोपडपट्यांचा आहे. तेथे हातावर पोट असलेला अशिक्षित कष्टकरी गरीबवर्ग राहतो आहे. त्यांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करता येत नाही. म्हणून त्यांना ही लस  थेट दिली जावी म्हणून हा निधी दिला आहे. दुसरं माझं आवाहन असं आहे की, ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार घरगुती गॅसवरील सवलत (सबसिडी) ती परवडणाऱ्यांनी सोडली. त्याचे अनुकरण या लसीच्या बाबतीत होण्याची गरज आहे. त्यामुळे ही लस घेण्याची ऐपत असलेल्यांनी घ्यावी, लसीचे पैसे राज्य सरकारकडे जमा करावेत. त्यातून या लसीकरण मोहिमेला बळ मिळणार आहे.
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख