नियम सर्वांना सारखे; आव्हाडांच्या गणेश आरतीवर अजितदादा गरजले 

ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांनी बाहेर पडायला पाहिजे, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले.
  Jitendra Awhad, Ajit Pawar, .jpg
Jitendra Awhad, Ajit Pawar, .jpg

पिंपरी : नियमांचे पालन सर्वांनीच केले पाहिजे, मग ते मंत्री असोत वा सर्वसामान्य. त्यामुळे कोरोना निर्बंध पाळतच आषाढीची पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नुकतीच केली. तशीच ती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक येथील नवश्या गणपतीची केली असेल, तर योग्य नाही, तर नियम सर्वांनाच सारखेच आहेत, असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (ता.२१ जुलै) पिंपरी-चिंचवडमध्ये व्यक्त केले. पिंपरी एमआयडीतील फिटवेल मोबलिटी प्रा. लि. च्या तीनचाकी इलेक्ट्रीक वाहन वितरण सेवेचे उदघाटन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पिंपरी-चिंचवड दौऱ्यात पक्षाचे पन्नास नगरसेवक निवडून आणत महापौरही शिवसेनेचा करण्याच्या नुकत्याच केलेल्या घोषणेवर संयमित व आघाडीला तडा जाणार नाही, असे भाष्य उपमुख्यमंत्र्यांनी केले. पक्ष कार्यकर्त्यांना स्फूरण चढण्यासाठी तसेच त्यांना कामाला लावण्याकरिता प्रत्येक पक्ष व त्यांचे नेते अशी वक्तव्ये करीत असतात, असे ते म्हणाले. तसेच प्रत्येक पक्षाने आपल्या व्यासपीठावर काय बोलावे, हा त्यांचा प्रश्न आहे, असे सावध उत्तर त्यांनी दिले. 

असे ते राऊत यांच्याबाबत बोलले असले, तरी ते कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना, तर उद्देशून नाही ना, अशी कुजबूज लगेचच ऐकायला मिळाली. शहरातील भक्तीशक्ती उड्डाणपूलाचे उदघाटन राष्ट्रवादीने अगोदरच केले. आता ते सत्ताधारी भाजपही करेल. असे दोनदा उद्घाटनाचे प्रकार यापूर्वीही झाले आहेत. त्यावर बोलताना जनतेच्या सोईचे असलेले रस्ते, पूल आदी कामे पूर्ण होऊनही ते सुरु होण्यास उशीर झाला की असे अनेकदा घडते. त्यामुळे ही कामे पूर्ण होताच लगेच त्याचे उद्घाटन केले पाहिजे.

अजित पवारांचा वाढदिवस आहे. मात्र, कोरोनामुळे त्यानिमित्त फ्लेक्सबाजी न करता रक्तदान शिबिरासारखे उपक्रम घेऊन तो साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी अगोदरच केले होते. त्यानंतर सुद्धा शहरात वाढदिवसाचे होर्डिंग्ज लागले. त्यावर काही गुन्हेगारांचेही फोटो असल्याचे निदर्शनास येताच अजितदादा काहीसे भडकले. मी त्यांना लावायला सांगितले का ते? चे चुकीचे म्हणजे अनधिकृत असतील, तर त्यावर पोलिसांनी कारवाई करावी. पालिका आय़ुक्त, महापौर वा स्थानिक जबाबदार पदाधिकाऱ्यांनीही अशी कारवाई करावी, असे ते म्हणाले. 

ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांनी बाहेर पडायला पाहिजे, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, दुसरीकडे परिस्थिती वेगळीच आहे, असे सांगत त्यांनी गेल्याच आठवड्यात नगर जिल्ह्यातील एका गावभेटीचा दाखला दिला. तेथे कुणीही मास्क लावलेला नव्हता. कोरोना नसल्याच्या वेळेसारखे त्यांचे वागणे होते. ही आलेली शिथिलता घालवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com