प्राधिकरण विलिनीकरणातून अजितदादांनी केली लांडगे, जगतापांची नाकेबंदी

हा निर्णय झाल्याने पालिकेतील सत्ताधारी भाजप व त्यांचे पदाधिकारी चवताळले आहेत.
After the merger of the authority, Ajit Pawar created a dilemma  Mahesh Landage and Laxman Jagtap
After the merger of the authority, Ajit Pawar created a dilemma Mahesh Landage and Laxman Jagtap

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (PNNTDA) विलीनीकरण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (PMRDA) करण्याच्या निर्णयातून सत्ताधारी पिंपरी-चिंचवड महपालिका व शहरातील भारतीय जनता पक्षाचे दोन्ही आमदार महेश लांडगे (भोसरी) व लक्ष्मण जगताप (चिंचवड) यांची नाकाबंदी होणार आहे. त्यामुळे या तिघा जुन्या, नव्या कारभाऱ्यांत आता खरा संघर्ष (FIGHT STARTED BETWEEN AJIT PAWAR AND Laxman JAGTAP, Mahesh LANDGE) सुरु झाला आहे. त्याची चुणूक या दोन्ही आमदारांनी या निर्णयावर आज दिलेल्या संतप्त प्रतिक्रियेतून मिळत आहे.

या निर्णयातून भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका व तिचे सध्याचे वरील दोन्ही कारभारी आमदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसणार असून विकास प्रकल्प रेंगाळणार असल्याची भीती त्यांनी वर्तवली आहे. तसेच, शहराला आता बकालपणा येण्याची शक्यता असल्याने त्यावरून त्यांनी संताप व्यक्त केल. पिंपरी महापालिका निवडणूक अवघ्या नऊ महिन्यांवर आली असताना हा निर्णय झाल्याने पालिकेतील सत्ताधारी भाजप व त्यांचे पदाधिकारी चवताळले आहेत. 


पिंपरी-चिंचवड शहराचा विकास थांबणार नसला, तरी त्याला काहीअंशी खीळ बसणार असल्याने हा निर्णय जाहीर होतो न होतो तोच आमदार लांडगेंनी संतप्त प्रतिक्रिया देत राज्य सरकार व त्यातून हा निर्णय ज्यांच्यामुळे सरकारने घेतला ते अजित पवार यांच्याविरुद्ध अप्रत्यक्षपणे रणशिंगच फुंकले. त्यांच्या मतदारसंघातील शेकडो कोटी रुपयांचे दोन महत्वाकांक्षी अशा प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

या विलीनीकरणामुळे पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी उपयोगी पडणाऱ्या प्राधिकरणाची सातशे कोटी रुपयांच्या ठेवी व वीस हजार कोटी रुपयांची जमीन पीएमआरडीकडे जाणार असल्याने शहरातील दोन्ही आमदार संतप्त झाले आहेत. त्याचा उपयोग पीएमआरडीए शहराबाहेर जिल्ह्यात इतरत्र म्हणजे बारामतीतही करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तशी शक्यता पालिकेचे महापौर माई ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे आणि सभागृह नेते नामदेव ढाके यांनी तर आज जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन वर्तवली आहे. 

शहराचे सौंदर्य आणि विकासात भर घालणारे अनेक विकासप्रकल्प प्राधिकरणाने शहरात उभे केल्याने एक वेगळी अशी ओळख पिंपरी-चिंचवडची झाली आहे. आता हे प्रकल्प होणार नाहीत. तसेच, सोन्याचे अंडे देणारी प्राधिकरणासारखी कोंबडी हातातून जाणार असल्याने आशिया खंडात श्रीमंत पालिका अशी असलेली ओळख आता राहिल की नाही, ही चिंता आता या दोन्ही आमदारांना सतावू लागली आहे. त्यामुळे प्राधिकरण पालिकेत वर्ग करण्याची मागणी वरील तिन्ही पालिका पदाधिकारी आणि दोन्ही कारभारी आमदारांनीही केली आहे.

एकूणच या एका निर्णयाने अजित पवार यांच्याविरुद्ध महेश लांडगे व लक्ष्मण जगताप आणि जोडीला पालिका पदाधिकारी असा सामना आता सुरु झाला आहे. तो येत्या काही दिवसांत चांगला रंगण्याचेही संकेत मिळाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com