चंद्रकांतदादांच्या इशाऱ्याने नितीन लांडगेंसह भाजपच्या १० सदस्यांच्या पोटात गोळा 

भाजपच्या दहा सदस्यांच्याही पोटात गोळा आला आहे.
 चंद्रकांतदादांच्या इशाऱ्याने नितीन लांडगेंसह भाजपच्या १० सदस्यांच्या पोटात गोळा 
Action to be taken against the culprits in Pimpri bribery case: Chandrakant Patil

पिंपरी : पिंपरी चिंचवड लाचखोर प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. त्यामुळे या लाचखोरीतील स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह समितीवरील भाजपच्या दहा सदस्यांच्याही पोटात गोळा आला आहे. (Action to be taken against the culprits in Pimpri bribery case: Chandrakant Patil)

दरम्यान, स्थायी समितीच्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी एसीबीच्या तपासाला सहकार्य करावे, असा आदेशही चंद्रकांत पाटील यांनी दिल्याने या लाचखोरीच्या सापळ्यात न अडकलेल्या या इतर स्थायी सदस्यांचीही चौकशी होण्याचे संकेत मिळाले आहेत. 

पिंपरी चिंचवडमधील लाचखोरीप्रकरणाची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल देण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शहाराच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांच्यावर सोपवली आहे. त्यानुसार आमदार मिसाळ या आज पिंपरीत आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि चार पालिका कर्मचाऱ्यांना सहा लाखांच्या लाचेतील पहिला एक लाख १८ हजार रुपयांचा हफ्ता घेताना परवा (ता. १८) पकडण्यात आले आहे. त्यांना उद्यापर्यंत (ता. २१) पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे. ती मिळाल्याने नितीन लांडगे यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे. त्यासाठी पक्षाच्या शहर प्रभारी व पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ या प्रदेशाध्यक्षांच्या आदेशावरून आज शहरात येऊन गेल्या. त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल सर्व संबंधीतांशी चर्चा करुन माहिती घेतली. 

भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे हे सांगली जिल्ह्यात आटपाडीजवळील झरे या गावी बैलगाडा शर्यतीला गेले आहेत. त्यांच्याशी आमदार मिसाळ यांनी फोनवरून बोलून माहिती घेतली. नंतर आपला अहवाल त्यांनी सायंकाळी प्रदेशाध्यक्षांना सादर केला आहे. त्यातील दोषींवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काय कारवाई करणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

आमदार माधुरी मिसाळ यांनी आज पिंपरी-चिचवडला भेट दिली व तेथे घडलेल्या प्रकाराबद्दल सर्व संबंधीतांशी चर्चा करुन सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणाबाबतचा सविस्तर अहवाल त्या मला सादर करतील आणि त्यानंतर या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी पोलिस तपासात सहकार्य करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येऊन या षडयंत्रामागील चेहरा समाजापुढे उघड होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in