हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी मोठी घडामोड : कारशेडसाठी जमीन अशी घेतली ताब्यात...
Acquired land in Maan for car shed of Hinjewadi-Shivajinagar Metro .jpg

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी मोठी घडामोड : कारशेडसाठी जमीन अशी घेतली ताब्यात...

सबंधित शेतकऱ्यांना नोटिसा देऊनही त्यांनी सदर जमिनीचा ताबा न दिल्याने ती पंचनामा करून ताब्यात घेण्यात आली.

पिंपरी : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कारशेड आणि पोच रस्त्यासाठी माण (ता. मुळशी, जि. पुणे) येथील साठ हजार १५० चौरस मीटर जमिन पुणे जिल्हा प्रशासनने पोलिस बंदोबस्तात पंचनामा करून आज (ता. १ एप्रिल ) ताब्यात घेतली. यामुळे मोठा अडथळा दूर झाल्याने या मेट्रोचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भूसंपादन अधिकारी तथा मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी ही कार्यवाही करून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) व महामेट्रोकडे जमिनीचा ताबा दिला. सबंधित शेतकऱ्यांना नोटिसा देऊनही त्यांनी सदर जमिनीचा ताबा न दिल्याने ती पंचनामा करून ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई शांततेत झाली. कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

मेट्रोच्या सार्वजनिक कामासाठी ही जमिन वाजवी नुकसानभरपाई देऊन संपादन करण्याचा निवाडा मावळ-मुळशी उपविभागीय कार्यालयाने २४ मार्च रोजी दिला होता. त्यानंतर सबंधित जागेचा ताबा देण्यासाठी सबंधितांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्याव्दारे आज (१ एप्रिल) ला उपस्थित राहण्यास सबंधित जागामालकांना बजावण्यात आले होते. अन्यथा पंचनामा करून भूसंपादन केले जाईल, असा इशारा नोटीसीव्दारे देण्यात आला होता. मात्र, आठ दिवसाच्या नोटीशीच्या कालावधीत कुणीही आपल्या जमिनीचा ताबा न दिल्याने ती आज पंचनामा करून ताब्यात घेण्यात आली. 

Edited By - Amol Jaybhaye 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in