अभाविपचे प्रदेश अधिवेशन प्रथमच उद्योगनगरीत होणार

जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असा दावा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) प्रदेश अधिवेशन प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये येत्या रविवारी (ता.७) होणार आहे.
abvp jpg
abvp jpg

पिंपरी : जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असा दावा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) प्रदेश अधिवेशन प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये येत्या रविवारी (ता.७) होणार आहे. आत्मनिर्भर भारत’ आणि ‛राष्ट्रीय शिक्षा नीती’ हा या अधिवेशनाचा प्रमुख विषय आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणाऱ्या या ५५ व्या प्रदेश अधिवेशनाचे उदघाटन  केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर याच्या हस्ते होणार आहे. स्वागत समिती अध्यक्ष म्हणून मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहेता, बालाजी शैक्षणिक संस्थेचे संचालक परम बालसुब्रमन्यम् हे उपाध्यक्ष, तर अभाविपचे पूर्व कार्यकर्ते अॅड. मोरेश्वर शेडगे हे सचिव असतील. नुकताच पद्मश्री जाहीर झालेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अभाविप चे पूर्व कार्यकर्ते गिरीश प्रभूणे हे स्वागत समिती संरक्षक असणार आहेत.

उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहराची शैक्षणिकनगरी म्हणून नविन ओळख होऊ पहात आहे, त्यामुळे अभाविपचे प्रदेश अधिवेशन विद्यार्थी जडणघडणीत मोलाचे ठरेल. असे शेडगे म्हणाले..

अभाविप ही गेली ७२ वर्ष शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अविरतपणे कार्यरत असलेली विद्यार्थी संघटना आहे. विद्यार्थी हा उद्याचा नाही आजचा नागरिक असून संघटन बंधनातून राष्ट्रहितासाठी झटणारे विद्यार्थी घडवणे हे ध्येय ठेवून ती कार्यरत असल्याचे शेडगे यांनी सांगितले. 

हे ही वाचा...

डॉ. तात्याराव लहानेंना फडणवीसांमुळे पद्मश्री मिळाली...  

पिंपरी : "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यातील भाजप सरकारच्या कारकिर्दीत त्रास झाला, हे पद्मश्री, प्रख्यात नेत्रतज्ज्ञ, डॉ. तात्याराव लहाने यांचे वक्तव्य योग्य नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जशी एकमेकांची उणीदुणी चव्हाट्यावर काढतात, तशी ती डॉ. लहानेंसारख्या प्रशासनातील अधिकाऱ्याने काढणे, हे त्यांना शोभत नाही,'' असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी (ता. 1 फेब्रुवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये सांगितले. 

समाजकंटकांच्या हल्यात चाकण येथे गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलिस रवींद्र करवंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी दरेकर पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

हा हल्ला शरम आणणारा आहे. आपल्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलिसाचीच सुरक्षा धोक्‍यात आली आहे, हे आपल्याला शोभा देणारे नाही, असे ते म्हणाले. पोलिसांवरच हल्ला झाला, तर त्याची दाद कोणाकडे मागणार? अशी विचारणा करून त्याबाबत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सरकारने असे प्रकार पुन्हा होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. 

डॉ. लहानेंच्या वक्तव्यावर बोलताना प्रशासनातील उणीदुणी त्यांनी बाहेर काढणे बरोबर नाही. त्याबाबत त्यांनी चार भिंतीच्या आत बोलायला पाहिजे होते, असे दरेकर म्हणाले. उलट फडणवीसांमुळे डॉ. लहानेंना पद्म श्री मिळालेली आहे, असा दावा त्यांनी केला. 

शिवसेनेच्या कथनी आणि करणीत फरक 

औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेवर शरसंधान करताना त्यांच्या करणी आणि कथनीत फरक आहे. औरंगाबाद महापालिकेत त्यांची सत्ता आहे, त्यामुळे त्यांनी तेथे नामांतराचा ठराव करावा. कॅबिनेटने निर्णय घ्यावा आणि केंद्राची मदत लागली, तर आम्ही पुढाकार घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. 

...तर राऊतांच्या पोटात दुखायचे काय कारण? 

फडणवीस यांच्या शब्दाला मान देऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपले उपोषण मागे घेतले, त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पोटात दुखायचे काय कारण? अशी विचारणा त्यांनी केली. अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला स्वार्थ साधता न आल्याने "सामना'तून टीका झाली, असे ते म्हणाले. 

केंद्रीय बजेट हे सर्वसमावेशक आणि सर्वसामान्यांचा विश्वास वाढवणारे आहे. मात्र विरोधी पक्षाला कावीळ झाली असल्याने त्यांना पिवळं दिसत आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली. 

प्रभूणेंच्या नोटिसीबद्दल विचारणा करणार 

पद्मश्री जाहीर झालेल्या गिरीश प्रभूणेंच्या मालमत्ता जप्ती नोटिसीशी पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा संबंध नसून ती पालिका प्रशासनाने बजावली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही ती का पाठवली याची विचारणा करण्यात येऊन पद्मश्रींचा सन्मान ठेवला जाईल, असे ते म्हणाले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com