उपमहापौरांची पहिल्याच दिवशी घंटागाडी, स्मशानभूमी कामगारांना दिवाळी भेट

पिंपरी-चिंचवड महानगपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर व कामगार त्यानेते केशव घोळवे यांनी पहिल्याच दिवशी शहर सुंदर ठेवणाऱ्या कंत्राटी घंटागाडी कामगारांची यावर्षीची दिवाळी दुप्पट गोड केली
PCMC Deputy Mayors Diwali gift to Hygiene workers
PCMC Deputy Mayors Diwali gift to Hygiene workers

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर व कामगार त्यानेते केशव घोळवे यांनी पहिल्याच दिवशी शहर सुंदर ठेवणाऱ्या कंत्राटी घंटागाडी कामगारांची यावर्षीची दिवाळी दुप्पट गोड केली. त्यांना डबल बोनस देण्यास उपमहापौरांनी प्रशासनास भाग पाडले. त्याजोडीने कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या शहराच्या स्मशानभूमी कामगारांनाही कायमस्वरुपी पालिका सेवेत घेऊन त्यांना किमान वेतन देण्यास सांगितले.

ऊसतोड कामगाराचा मुलगा असलेल्या घोळवेंची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली दुसऱ्या .दिवशी त्यांचा ऊस कामगार नेत्या व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मुंबईत सत्कार केला. त्यानंतर कामकाजाच्या पहिल्या दिवशी काल त्यांनी पालिकेत बैठक घेऊन स्मशानभूमी व घंटागाडी या उपेक्षित कंत्राची कामगारांचा गेल्या कित्येक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. घंटागाडी कामगारांना १५ हजाराऐवजी यावेळी ३० हजार रुपये बोनस देण्यावर त्यांनी पालिका आय़ुक्त श्रावण हर्डीकर यांना सही करण्यास भाग पाडले. 

तर, स्मशानभूमी कामगारांचा किमान वेतनाचाही प्रश्न पहिल्याच दिवशी त्यांनी मार्गी लावला. त्यांना किमान २४ हजार वेतन मिळणे अपेक्षित असताना  त्यांना कंत्राटदार गेली वीस वर्षे निम्माच पगार देत होते,अशी माहिती उपमहापौरांनी दिली. त्यामुळे या कामगारांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने किमान वेतन देण्याची व त्याजोडीने कोरोना भत्ता देण्याचीही मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली.

घोळवे हे ऊसतोड कामगारपुत्र आहेत. नगरसेवक होण्यापूर्वी ते शहरातील एका खासगी कंपनीत कामगारांचे नेते होते. हे काम नगरसेवक झाल्यावरही त्यांनी सुरुच ठेवले आहे. त्यामुळे कामगारांच्या प्रश्न इतर पालिका पदाधिकाऱ्यांच्या तुलनेत त्यांना पटकन समजतो. त्याचा ते पाठपुरावा करतात. उपमहापौपद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरतानाच त्यांनी निवडून आल्यानंतर पहिल्या दिवसाच्या कामाची सुरवात कामगारांचा प्रश्न सोडवून करण्याचा निश्चय केला होता.तो शब्द त्यांनी पाठला. त्यामुळे घटनात्मक नसलेल्या उपमहापौरपदाला मावळते उपमहापौर तुषार हिंगे यांच्याप्रमाणेच घोळवेही वलय प्राप्त करून देतील,अशी चर्चा पालिका वर्तुळात आता सुरु झाली आहे.
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com