ऊसतोड कामगारपुत्र उपमहापौर पोहोचले पालावर

उत्तर पुणे जिल्ह्यात (निरगुडसर,ता.आंबेगाव) विहीरीत पडून मृत्यू पावलेल्याआठ वर्षीय मुलीच्या ऊसतोड कामगार कुटुंबाला भेटून पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांनी आपल्यातील ऊसतोड कामगाराचा मुलगा व कामगार नेता अद्याप जिवंत असल्याचा प्रत्यय दिला.
PCMC Deputy Mayor Visited Sugarcane Workers home
PCMC Deputy Mayor Visited Sugarcane Workers home

पिंपरी : उत्तर पुणे जिल्ह्यात (निरगुडसर,ता.आंबेगाव) विहीरीत पडून मृत्यू पावलेल्याआठ वर्षीय मुलीच्या ऊसतोड कामगार कुटुंबाला भेटून पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांनी आपल्यातील ऊसतोड कामगाराचा मुलगा व  कामगार नेता अद्याप जिवंत असल्याचा प्रत्यय  दिला.

या कुटुंबाचे सांत्वन करताना त्याला आर्थिक मदत देण्यासह अशा कुटुंबांचा विमा उतरविण्याची मागणी त्यांनी हे ऊसतोड कामगार काम करीत असलेल्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडे केली.
 
ताई, तुझ्या वेदना मीच जाणू शकतो,असे ऊस तोडणी कामगारांच्या वेदना स्वतः अनुभवलेले उपमहापौर या मुलीच्या आईचे सांत्वन करताना म्हणाले. दोन दिवसापूर्वी विघ्नहरच्या ऊसतोडणी कामगाराची आठ वर्षाची मुलगी तेजश्री रामेश्वर पवार ही खेळताना विहिरीत पडली व तिचा मृत्यू झाला. पिंपरीच्या उपमहापौरांना हे समजताच काल त्यांनी निरगुडसर गाठले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस दीपक नागरगोजे त्यांच्याबरोबर होते. 

उपमहापौरांनी प्रथम   घटनास्थळी भेट दिली.तेथील परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर विघ्नहरचे निरगुडसर पारगांव विभागाचे गट अधिकारी बाळशीराम टाव्हरे व नवनाथ चव्हाण यांच्यासह ऊस तोडणी कामगारांच्या पालावर जावून मृत तेजश्रीचीआई कल्पना, आजोबा ज्ञानेश्वर राठोड, आजी मथुराबाई राठोड यांची भेट घेतली. पालावरील लोकांशी व चर्चा करुन तेथे कारखान्याच्या वतीने पुरविण्यात येत असलेल्या सुविधा व सोईंचीही केशव घोळवे यांनी माहिती घेतली. 

कारखान्याचे संचालक नामदेव काशिनाथ थोरात यांच्या निवासस्थानी ते गेले. कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्याशीही ते दुरध्वनीवरुन बोलले.हा अपघात झालेल्या विहिराला संरक्षक कठडा नसल्याने तातडीने तिची दुरुस्ती करावी,ऊस तोडणी कामगार जेथे वास्तव्यास आहेत त्याठिकाणी फिरते शौचालय ठेवण्यात यावे, अशा मागण्या त्यांनी शेरेकरांकडे केल्या. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांविषयीही त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम यांच्याकडून या भेटीत माहिती घेतली.  
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com