आवताडेंच्या विजयासाठी भोसरीचे महेश लांडगे उतरले पंढरपूरच्या रणसंग्रामात

त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याने ते पुन्हा प्रचाराला लागले आहेत.
Bhosari MLA Mahesh Landage's campaign for BJP candidate Avtade in Pandharpur by-election
Bhosari MLA Mahesh Landage's campaign for BJP candidate Avtade in Pandharpur by-election

पिंपरी : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा भाजप प्रभारी, राज्याचे माजी मंत्री आणि मावळचे माजी आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे हे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात तळ ठोकून आहेत. आता पिंपरी-चिंचवड भाजपचे अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे हे सुद्धा मंगळवारपासून (ता. ६ एप्रिल) मंगळवेढ्याला गेले असून त्यांनी घरटी प्रचार करण्यावर भर दिला आहे.

विधान परिषेदेतील आमदार व सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबरोबर मंगळवारी भोसरीचे महेश लांडगे यांनी प्रचार केला. मात्र, बुधवारी (ता. ७ एप्रिल) मोहिते-पाटलांचा कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. त्यामुळे त्यांना तातडीने क्वारंटाइन व्हावे लागले. तर, सावधगिरीचा उपाय म्हणून आज सकाळी महेश लांडगे यांनीही अॅंटीजेन टेस्ट करून घेतली. त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याने ते पुन्हा प्रचाराला लागले आहेत. कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने राज्यभर निर्बंध आले आहेत. त्याचा फटका निवडणूक प्रचारालाही बसला आहे. परिणामी जाहीर सभा, मेळावे, चौकसभा याऐवजी घर टू घर प्रचारावर भर दिला जात आहे. महेश लांडगे यांनीही असाच प्रचार मंगळवेढ्यात सुरु केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर कार्यालयात मंगळवारी (ता. ६ एप्रिल) पक्षाचा झेंडा फडकावून महेश लांडगे मंगळवेढ्याच्या दिशेने रवाना झाले. त्यांना प्रचारासाठी मंगळवेढा भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते तीन दिवस मंगळवेढ्यात प्रचार करणार आहेत. तर, १२ तारखेनंतर शहरातून आणखी काही रसद या पोटनिवडणुकीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तूर्त मावळ व पिंपरी-चिंचवड परिसरातील भाजपचे आजी, माजी आमदार पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

आवताडेंच्या विजयासाठी झटणाऱ्या रणजितसिंहांना कोरोना; क्वारंटाइन कोण कोण होणार


मंगळवेढा (जि. सोलापूर)  ः पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी आलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी मंगळवेढा शहरासह तालुक्यातील 10 गावांत प्रचारसभा घेतल्या आहेत. पोटनिवडणुकीनंतर तालुक्यात कोरोनाचा विस्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणा सतर्क राहण्याची गरज आहे.

मंगळवेढा तालुक्यामध्ये सध्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धुरळा उडला आहे. भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी समाधान आवताडे यांना विजयी करायचेच, या भूमिकेतून आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी माघार घ्यावी म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या समवेत बबनराव आवताडे यांच्यासोबत बैठक घेतली होती. तसेच त्यांच्याबरेाबर प्रचारसभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापासून सर्व नेते व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे आता क्वारंटाईन कोण कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com