पुरावे द्या, पिंपरी चिंचवड पालिकेची चौकशी लावतो - अजित पवार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत बरंच काही चाललंय,असं ऐकतोय.पण, नुसतं कानावर येऊन चालत नाही. पुरावे द्या, चौकशी लावतो, असे सावध उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी पालिकेतील एफडीआर घोटाळ्याच्या आरोपावर आज पिंपरी-चिंचवडमध्ये दिले.
पुरावे द्या, पिंपरी चिंचवड पालिकेची चौकशी लावतो - अजित पवार
Ajit Pawar

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत बरंच काही चाललंय,असं ऐकतोय.पण, नुसतं कानावर येऊन चालत नाही. पुरावे द्या, चौकशी लावतो, असे सावध उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी पालिकेतील एफडीआर घोटाळ्याच्या आरोपावर आज पिंपरी-चिंचवडमध्ये दिले. 

पन्नास टक्के प्रिमीयम देण्याच्या राज्य मंत्रीमंडळाच्या निर्णयाचा लाभ बिल्डरांना होईल या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपात अजिबात तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.मुद्रांक शुल्क कमी केल्याप्रमाणे या निर्णयाचाही फायदा ग्राहकांना होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड पोलिस आय़ुक्तालयातील पोलिसांना स्मार्ट वॉच आणि सायकल वाटप केल्यानंतर अजितदादा माध्यमांशी बोलत होते. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या गावात ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने भाजपशी युती केली असून शिवसेना वेगळी लढते आहे,हे फार चुकीचे झाले, हे अजिबात बरोबर नाही. त्यावर काल चर्चा झाली असून आमच्या लोकांना वरिष्ठांनी काय सुचना द्यायच्या त्या दिल्या आहेत, असे ते म्हणाले. पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील लवळेसह नऊ ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुका या गुंडगिरीच्या जोरावर बिनविरोध झाल्याच्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेतील संसदेवर झालेला निषेधार्ह आहे, पण,आपल्याकडे इतके प्रश्न असताना त्यावर चर्चा करणे बरोबर ठरणार नाही,असेही ते म्हणाले. कोरोनाची लस पहिल्यांदा आपण घेणार का या प्रश्नाला उत्तर देताना आपला जीव धोक्यात घालून  इतरांचे जीव वाचविणारे डॉक्टर,नर्सेस,पोलिस यांना ती प्रथम दिली पाहिजे, त्यानंतर ज्येष्ठांना विचार केला पाहिजे., ओळख आहे म्हणून स्वार्थ साधून घ्यायचा हे बरोबर नाही,असेही पवार यांनी सांगितले. 
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in