आमदार महेश लांडगेंनाही कोरोनाची लागण

पिंपरीचे आमदार व भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आमदार महेश लांडगेंनाही कोरोनाची लागण
Pimpri MLA Mahesh Landge Found Corona Positive

पिंपरी : भोसरीचे आमदार व पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लांडगे यांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्याने आता अनेक दिग्गजांना आता काळजी घ्यावी लागणार आहे. शरद पवार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांसोबत लांडगे हे दौऱ्यात आणि बैठकांत सगभागी झाले होते.

लांडगे हे शुक्रवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार गिरीश बापट, अमोल कोल्हे यांच्यासह जवळपास सर्व आमदारही उपस्थित होते. या बैठकीनंतर लांडगे यांनी भाजपच्या आंदोलनातही सहभाग घेतला होता. फडणवीस यांच्या पिंपरी-चिंचवड दौऱ्याच्या वेळी त्यांनी लांडगेसह कोविड रुग्णालयाला भेटी दिल्या होत्या. पिंपरी चिंचवड मधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक करोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले आहे. 

लांडगे यांच्या घरातील अन्य व्यक्तींचीही तपासणी करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचाही शोध घेण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत मंत्री अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे या राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. नांदेडमधील एका आमदारावरही कोरोनाचे उपचार सुरू आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in