कोरोनाची लस टोचून घेण्यास एकाने दिला नकार 

या रंगीत तालमीसाठी 29 जणांची निवड लसीकरणासाठी करण्यात आली होती.
कोरोनाची लस टोचून घेण्यास एकाने दिला नकार 
In Pimpri-Chinchwad, one person refused to be vaccinated against corona

पिंपरी : कोरोना महामारीवरील लस आल्यानंतर ती टोचून घेण्याच्या अनुभवाची आज (ता. 2 जानेवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये रंगीत तालीम घेण्यात आली. कोरोना लसीकरणाच्या या "ड्राय रन'मध्ये 28 जणांना ती देण्याचे मॉकड्रिल घेण्यात आले. मात्र, एकाने कोरोनाची लस टोचून घेण्यास चक्क नकार दिला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात हे मॉकड्रिल घेण्यात आले. 

देशभर आजपासून कोरोना लसीकरणाची प्रात्यक्षिके सुरु करण्यात आली आहेत. त्यात महाराष्ट्रातील नंदूरबार, नागपूर, पुणे, जालना या चार जिल्ह्यांत ही रंगीत तालीम झाली. पुणे जिल्ह्यातील हा "ड्राय रन' पिंपरीत घेण्यात आला. या मॉकड्रिलमध्येही एकाने लस टोचून घेतली नसल्याचे नाट्य केले गेले. 

या वेळी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, राज्य आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील, "युनिसेफ'चे सल्लागार डॉ. सतीश डोईफोडे, सर्वेलन्स मेडिकल ऑफिसर डब्ल्यू. एच. ओ. डॉ. चेतन खाडे, रिजनल टिम लिडर डब्ल्यू. एच. ओ. डॉ. राहुल शिंपी, लस व शितसाखळी व्यवस्थापक नीरज गुप्ता, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणी, डॉ. बाळासाहेब होडगर, वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

त्यांनी शुक्रवारी (ता. 1 जानेवारी) या रंगीत तालमीच्या तयारीची पाहणी केली होती. 

शासकीय मार्गदर्शक सुचनांनुसार या रंगीत तालमीसाठी 29 जणांची निवड लसीकरणासाठी करण्यात आली होती. त्यातील 
28 जणांना लस देण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. पण, प्रत्यक्षात लस टोचण्यात आली नाही. एकाने लसीकरणास नकार दिला. त्याचीसुद्धा रंगीम तालीम घेण्यात आली.

लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष तयार करण्यात आलेले आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in