"आक्रमक आंदोलन कर...हा गोपीनाथ मुंडे तुझ्या पाठीशी आहे..."

जम्मू काश्मीरला जाऊन तिरंगा फडकावणाऱ्या मोरेश्वरचा सत्कार करायचा आहे, असे सांगत त्यांनी शाल पांघरून व पुस्तक भेट देऊन माझा जाहीर सत्कार केला.
मोरेश्वर12.jpg
मोरेश्वर12.jpg

पिंपरी : गोपीनाथ मुंडेसाहेंबाची बुद्धी अतिशय तल्लख होती. सामान्य कार्यकर्त्यांचीही जाण ठेवून ते त्याला बळ देत होते. त्याचा प्रत्यय २००११ मध्ये मी स्वत घेतला. २०१० ला मी कलकत्ता ते काश्मीर या भाजयुमोच्या तिरंगा यात्रेत सामील झालो होतो. पण, आम्हाला जम्मू येथे अडविण्यात आले. तरीही पर्यटक बनून आम्ही काही युवक कार्यकर्ते श्रीनगरला पोचलो आणि तेथे तिरंगा फडकावला होता.

या घटनेच्या दुसऱ्या वर्षी मुंडेसाहेब पिंपरी-चिंचवडमध्ये सावरकर मंडळाच्या पुरस्कार वितरणासाठी आले. त्यावेळी मी सभागृहात खाली बसलो होतो. ते साहेबांनी पाहिले. त्यांनी मंडळाचे भास्कर रिकामे यांना मला वर बोलवायला सांगितले. जम्मू काश्मीरला जाऊन तेथे तिरंगा फडकावणाऱ्या मोरेश्वरचा सत्कार करायचा आहे, असे सांगत त्यांनी शाल पांघरून व पुस्तक भेट देऊन माझा जाहीर सत्कार केला, अशी गोपीनाथ मुंडेसाहेबाची ह्र्द्य आठवण त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस आणि स्वीकृत नगरसवेक अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी सांगत आपल्या आदरणीय नेत्याच्या आठवणींना उजाळा दिला.
 
मुंडेसाहेबांच्या एक नाही, तर अनेक आठवणी आजही कायमस्वरुपी मनात आहेत, असे सांगत अॅड. शेडगे म्हणाले, सध्या केंद्रीय मंत्रीमंडळात अर्थराज्यमंत्री असलेले अनुराग ठाकूर हे २०१० ला भारतीय जनता युवा मोर्चाचे (भाजयुमो) राष्ट्रीय अध्यक्ष होते. जम्मू काश्मीर हे आतासारखे त्यावेळी नव्हते. त्याला स्वायत्त दर्जा होता. दहशतवाद तेथे टोकाला गेलेला होता. त्यामुळे श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावणे दिव्यच होत. म्हणून ठाकूर यांनी कलकत्ता ते काश्मीर अशी तिरंगा यात्रा काढली.

माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे त्यावेळी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात आम्ही या यात्रेत सामील झालो होतो. मात्र, आम्हाला जम्मूतच अडविण्यात आले. त्यानंतरही निलंगेकर व आम्ही मोजके युवा कार्यकर्ते पर्यटक म्हणून पुढे गेलो. अखेर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावलाच. यानंतर पोलिसांनी आम्हाला अटक केली होती. 

या घटनेच्या दुसऱ्या वर्षीच मुंडेसाहेब सावरकर मंडळाच्या बक्षीस वितरणाला शहरात आले  होते. त्यावेळी त्यांच्या पारखी नजरेने मला सभागृहात खाली बसलेले असतानाही नेमके हेरले. तिरंगा यात्रेत सहभागी झाल्याचे त्यांना स्मरणात होते. त्यामुळे लगेच त्यांनी आयोजकांना सांगितले.

मोरेश्वरला वर बोलवा. तिंरंगा यात्रेत जम्मू काश्मीरला जाऊन त्याने तेथे तिरंगा फडकावला होता. त्याचा सत्कार करायचा आहे, असे ते म्हणाले आणि राष्ट्रीय व राज्य पातळीच्या पुरस्कार्थीबरोबर माझाही सत्कार झाला.

तरुण कार्यकर्त्याला बळ देणारी मुंडेसाहेबांची दुसरी आठवण कथन करताना अॅड. शेडगे म्हणाले, अटलजींच्या वाढदिवशी २५ डिसेंबर २०१३ रोजी शहर भाजपच्या कार्यकारिणीची घोषणा झाली. त्यात भाजयुमोच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली.

त्याच दिवशी मध्यरात्री मुंडेसाहेबांचा मला फोन आला. त्यांनी माझी निवड झाली म्हणून अभिनंदन, तर केलेच. शिवाय चांगले कर, युवा मोर्चाचा चांगला विस्तार कर, आपली विचारधारा युवकांपर्यंत पोहचव, पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रभक्त तरूणांची एक चांगली फळी तुझ्या नेतृत्वात या पक्षात तयार झाली पाहिजे, आक्रमक आंदोलने कर. हा गोपीनाथ मुंडे तुझ्या पाठीशी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com