नगरसेविकेच्या पतीनेच विकत घेतला चोरीचा माल

सावरदरी (ता.खेड,जि.पुणे) एअरसिल टेक्नोलॉजी एलएलपी या कंपनीत ही चोरी २० डिसेंबर ते २९ जानेवारी दरम्यान झाली होती.तेथे चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्रातील मशिनरी दुरुस्तीसाठी आली होती. त्यातील दोन लाख चाळीस हजार किमतीचे सहा बेअरिंग्ज चौरीला गेले होते
Crime
Crime

पिंपरीः चोरीचा माल विकत घेतल्याबद्दल श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेविकेच्या पतीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चाकण एमआयडीसीतील कंपनीत दुरुस्तीसाठी आलेल्या चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राच्या मशिनरीतील चोरलेल्या बेअरिंग्ज या मोठ्या भंगार व्यावसायिक नगरसेविकेच्या पतीने विकत घेतल्याचा आऱोप आहे.तो फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान,यामुळे शहरात व त्यातही भाजपच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कारण नुकतेच पद्मश्री जाहीर झालेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभूणे यांना थकिमात्रत मिळकतकरापोटी पालिका प्रशासनाने मालमत्ता जप्तीची नोटीस पाठविलेल्याने ते अगोदरच टीकेचे धनी झाले आहेत.

त्याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना खुद्द स्पष्टीकरण देत आपल्या पक्षाची बाजू नुकतीच मांडावी लागली होती. आता,या चोरीच्या प्रकरणात नगरसेविकेचा पतीच अडकल्याने शहर भाजपची आणखी कोंडी झाली आहे. यातून ते चार हात कसे दूर राहणारे काय स्पष्टीकरण देतात,याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महाळूंगे (ता.खेड) पोलिस चौकीने याबाबत चोरीचा गुन्हा नोंदवून चोरी झालेल्या कंपनीचा वॉचमन आणि दोन स्थानिक भंगारवाले अशा तिघांना अटक केली आहे. इम्रान शौकतअली बागवान, इम्रान मुस्तफा हुसेन आणि रणजित राजेंद्र चौहान अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.तर, पिंपरी-चिंचवडमधील नगरसेविकेचा पती आणि आणखी रशीद हा आणखी दुसरा एक भंगारवाला या गुन्ह्यात फरार आहे.

सावरदरी (ता.खेड,जि.पुणे) एअरसिल टेक्नोलॉजी एलएलपी या कंपनीत ही चोरी २० डिसेंबर ते २९ जानेवारी दरम्यान झाली होती.तेथे चंद्रपूर येथील औष्णिक वीज केंद्रातील मशिनरी दुरुस्तीसाठी आली होती. त्यातील दोन लाख चाळीस हजार किमतीचे सहा बेअरिंग्ज चौरीला गेले होते.त्याबाबत ३० जानेवारीला महाळूंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.प्राथमिक चौकशीत पोलिसांना कंपनीच्या वॉचमनवर संशय आल्याने त्याची पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्याने स्थानिक दोन भंगारवाल्यांना बेअऱिंग्ज विकल्याचे सांगितले. त्यांना अटक करून त्यांची चौकशी केली असता त्याने फरार आरोपी नगरसेविकेचा पती आणखी एका भंगारवाल्याला विकल्याचे सांगितले. यासंदर्भात सदर नगरसेविकेला फोन केला असता त्यांनी तो बंद ठेवल्याचे आढळले.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com