नाथाभाऊ खडसे इफेक्ट आता पिंपरी-चिंचवडमध्ये; एनसीपीत इनकमिंग? - PCMC OBC Women Wing President Resigns from Party | Politics Marathi News - Sarkarnama

नाथाभाऊ खडसे इफेक्ट आता पिंपरी-चिंचवडमध्ये; एनसीपीत इनकमिंग?

उत्तम कुटे
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरांचा पिंपरी-चिंचवडमधील पहिला धक्का भाजपला बसला. पक्षाच्या शहर ओबीसी महिला मोर्चा अध्यक्षा सारिका पवार यांनी पद व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.

पिंपरी :  नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरांचा पिंपरी-चिंचवडमधील पहिला धक्का भाजपला बसला. पक्षाच्या शहर ओबीसी महिला मोर्चा अध्यक्षा सारिका पवार यांनी पद व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. शहरातील मूळचे खान्देशातील आणखी काही भाजप कार्यकर्ते पक्ष सोडणार असून त्यांचा प्रवेश नंतर होणार असल्याचे पवार यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

पवार या मूळच्या खान्देशातील आहेत. नाथाभाऊ माझे नेते आहेत, असे सांगत त्यांच्या सन्मानार्थ आपण राजीनामा देत असल्याचे त्या म्हणाल्या.नाथाभाऊंचा संघर्ष माझ्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनीच राजीनामा दिल्याने मी सुद्धा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.नाथाभाऊ म्हणतील ती पूर्वदिशा असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत अप्रत्यक्षपणे दिले. शहरातील मूळचे खान्देशातील तीस-चाळीस महिला, पुरुष भाजप कार्यकर्ते येत्या काही दिवसांत पक्षाला रामराम ठोकणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पद व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्याकडे दिला.

पवार या भाजपची शहरात सत्ता नसल्यापासून पक्षात हिरीरीने काम करीत होत्या. गेल्या आठ वर्षात मंडलाध्यक्ष,महिला मोर्चा शहर सरचिटणीस अशी पदे त्यांनी भुषविली आहेत. दोन महिन्यापूर्वी त्यांची नियुक्ती पक्षाची शहर ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून झाली होती. गत महापालिका निवडणुकीत २०१७ निव्वळ नाथाभाऊ समर्थक म्हणून त्यांचे तिकिट कापले गेले होते. दरम्यान, पालिकेत प्रथमच सत्ता येऊनही त्यांच्या कामाची योग्य ती दखल घेण्यात आली नव्हती.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख