Breaking : पिंपरीचे माजी विरोधी पक्षनेते कोरोना पाॅझिटिव्ह

पिंपरी चिंचवडमध्ये आजपर्यंत दोन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, यापूर्वी चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला, माजी नगरसेवक असलेल्या त्यांच्या पतीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Breaking : पिंपरीचे माजी विरोधी पक्षनेते कोरोना पाॅझिटिव्ह
Ex Leader of opposition in PCMC Found Corona Positive

पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेता तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे. 

लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संबंध आला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये आजपर्यंत दोन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, यापूर्वी चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला, माजी नगरसेवक असलेल्या त्यांच्या पतीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दापोडीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, पुणे विभागातील  १३ हजार ५७६  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २२ हजार ५९ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण ७ हजार ५४८ आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण ४७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४७२ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण ६१.५४  टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण  ४.२४  टक्के आहे,अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in