भाजप शहराध्यक्षांनी लावला प्रभागनिहाय बैठकांचा धडाका - PCMC BJP Preparation for Graduate Election | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

भाजप शहराध्यक्षांनी लावला प्रभागनिहाय बैठकांचा धडाका

उत्तम कुटे
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत यश मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपने 'टीम वर्क' ने काम सुरू केले असून पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळावे. यासाठी शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी 'वज्रमूठ' बांधली आहे.

पिंपरी : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत यश मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपने 'टीम वर्क' ने काम सुरू केले असून पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळावे. यासाठी शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी 'वज्रमूठ' बांधली आहे.

पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शहर भाजप एकवटली असल्याचे दिसून आले. आहे. युवा मोर्चा आणि महिला आघाडीसह प्रमुख सेलच्या पदाधिकाऱी अधिक सक्रीय झाले आहेत.दरम्यान,नवमतदारांवर पक्षाने अधिक लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून आले.खूपच कमी मतदान होणाऱ्या या निवडणुकीत ते जास्त कसे होईल, यावरही भाजपने यावेळी भर दिला आहे.

दरम्यान, मतदारसंघातील पक्षाच्या विजयाच्या हॅटट्रिकमध्ये आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी शहर भाजपने काल   प्रभागनिहाय बैठकांचा धडाका लावला.रात्री उशीरापर्यंत त्या पक्ष कार्यालयात सुरु होत्या. सर्व ३२ प्रभागाच्या बैठका घेण्यात आल्या.त्यात या निवडणुकीतील मतदान पद्धतीविषयी खास सांगण्यात आले.प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, माजी महापौर नितीन काळजे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी पुणे पदवीधरमधून पुन्हा एकदा विजयाची पताका फडकविली जाईल, असा विश्वास लांडगे यांनी यावेळी व्यक्त केला.
 
पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान हे व्होटिंग मशीनव्दारे नव्हे,तर पारपारिक पद्धतीने मतपत्रिकेवर होते.तसेच  मतदारांना आपल्या पसंतीप्रमाणे मते द्यायची (पसंती क्रमांक) असतात.सर्वात पहिली पसंती असणा-या उमेदवाराच्या समोर मराठी, इंग्रजी किंवा रोमन यापैकी एका भाषेतील आकडय़ांमध्ये 1 अंक लिहायचा असतो. तर, दुसऱ्या पसंतीच्या उमेदवारा समोर 2 हा अंक लिहायचा असतो. या प्रमाणे पसंती क्रमांक देता येतो. तो लिहिताना तो एका भाषेतील आकडयांमध्येच लिहावा. उदाहरणार्थ (१,२,३ असे मराठीत किंवा 1,2,3 असे इंग्रजीत आकडे लिहिता येतील).मतपत्रिकेवर पसंती क्रमांक सोडून दुस-या कसल्याही खाणाखुणा करु नयेत.तसेच पसंती क्रमांक लिहिताना स्वत:चा पेन किंवा पेन्सिल याऐवजी जांभळ्या रंगाचा स्केच पेन मतदान केंद्रावर मतदारांना दिला जातो, त्याचाच वापर मतदानासाठी करण्यात यावा. अन्यथा मत बाद ठरेल,अशा मतदारांसा़ठी असलेल्या सुचना यावेळी उपस्थितांना देण्यात आल्या. त्यासंबधीचे पत्रक मतदार व विशेषकरून यावेळी नव्याने नोंदणी केलेल्या नवमतदारापर्यंत पोचवा,असे आवाहनही करण्यात आले आहे.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख