पंधरा वर्षांत केली नाहीत, तेवढी कामे दोन वर्षांत केली : कोल्हेंचा आढळरावांवर निशाणा  - NCP MP Amol Kolhe criticizes former Shiv Sena MP Shivajirao Adhalrao Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

पंधरा वर्षांत केली नाहीत, तेवढी कामे दोन वर्षांत केली : कोल्हेंचा आढळरावांवर निशाणा 

उत्तम कुटे 
शनिवार, 6 मार्च 2021

विमानतळ पुन्हा खेडला येण्याची शक्‍यता नाही, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे कबूलही केले.

पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघात 15 वर्षांत जी कामे झाली नाहीत, ती माझ्या खासदारपदाच्या गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात केली आहेत, अशा शब्दांत शिरूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या मतदारसंघात शिवसेनेचे तीन टर्म खासदार असलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. 

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने शनिवारी (ता. 6 मार्च) पिंपरी-चिंचवडमध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात खासदार कोल्हे यांनी माजी खासदार तथा शिवसेना उपनेते आढळरावांना वरील टोमणा लगावला. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, माजी अध्यक्ष सुरेश मेहेत्रे आणि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

केंद्र सरकारने जीएसटीबाबत निर्णय घेताना घाई केल्याने त्याची झळ देशभरातील उद्योग धंद्यांबरोबरच पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्ट्याला देखील बसल्याची टीका खासदार कोल्हे यांनी या वेळी केली. चाकण हे मल्टी मॉडेल हब होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असेही ते म्हणाले. बेलसरे व मेहेत्रे यांनी यावेळी लघुउद्योजकांच्या मांडलेल्या अडचणी दूर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. 

खेडचा विमानतळ पुरंदरला गेल्याच्या प्रश्नावरही त्यांनी अप्रत्यक्षपणे माजी खासदारांनाच पुन्हा लक्ष्य केले. ही संधी आली होती. पण, ती कुणामुळे गेली, याचा याचा उहापोह न करता त्यावर आता पर्याय शोधला पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच, जिल्ह्यातच हा दुसरा विमानतळ होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, तो पुन्हा खेडला येण्याची शक्‍यता नाही, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे कबूलही केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत मी लक्ष घातलेच आहे. पण, असे लक्ष घालणे म्हणजे केवळ राजकारण नाही, तर लोकांची अपेक्षापूर्ती करणे आहे, असे खासदार कोल्हे यांनी स्पष्ट केले. 

आपल्या पहिल्याच टर्ममधील दोन वर्षांचा लेखाजोगा मांडताना खासदार कोल्हे म्हणाले, ""चाकण-हिंजवडी मेट्रोचा डीपी प्लॅन, एमएसआरडीसीचा रिंगरोड, पुणे-नाशिक हायवेवरील चाकण, राजगुरुनगर, कळंब, मंचर, नारायणगाव, आळेफाटा येथील बायपास दोन वर्षांत मार्गी लावले आहेत. तळेगाव-चाकण-शिक्रापूर-नगर या हायवेला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सहा हजार कोटी रूपये मंजूर केल्याचे नुकतेच जाहीर केले आहे.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख