केंद्र सरकार व भाजपच्या जवळ गेल्याने अंबानींना धमकी : मीरा बोरवणकर

उद्योगपती मुकेश अंबानी हे भारतीय जनता पक्षाच्या व केंद्र सरकारच्या जवळ गेल्याने राज्य सरकारकडे त्यांच्या झालेल्या
 Meera Borwankar .jpg
Meera Borwankar .jpg

पिंपरी : उद्योगपती मुकेश अंबानी हे भारतीय जनता पक्षाच्या व केंद्र सरकारच्या जवळ गेल्याने राज्य सरकारकडे त्यांच्या झालेल्या, दूर्लक्षातून त्यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला असावा, अशी शंका राज्याच्या माजी पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांना वाटते आहे.

अंबानी प्रकरण हे एकट्या सचिन वाझेचे काम नसून त्याला मोठे राजकीय पाठबळ आहे, अशी शक्यताही बोरवणकर यांना वाटते आहे. मात्र, ते न्यायालयात सिद्ध करणे अवघड असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

यावेळी त्यांनी चकमकफेम पोलिस अधिकारी तथा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा तथाकथित एन्काऊंटर स्पेशालिस्ट असा उल्लेख केला. त्याचवेळी ते प्रामाणिक असल्याचे व बेजबाबदार नसल्याचेही सांगितले. मात्र, त्यांचा त्यांचे वरिष्ठ आणि राजकारणी यांनी मात्र, गैरवापर केला, असे त्या म्हणाल्या. सुरवातीला चांगली प्रतिमा असलेले हे एन्काउंटर स्पेशालिस्ट नंतर स्वत: खंडणीखोर बनले, असे त्या खेदाने म्हणाल्या.

पोलिस खात्यातील भ्रष्टाचारात खालपासून वरपर्यंत सर्वजण सामील आहेत, असा आरोप बोरवणकर यांनी केला. हफ्तेखोरी तथा भ्रष्टाचार तसेच कायदा व सुव्यवस्था तसेच पोलिस, गुन्हेगार, राजकारणी आणि नोकरशाही यांची अभद्र युती महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशभरात आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. हफ्तेखोरी तथा भ्रष्टाचार आणि कायदा व सुव्यवस्था (त्यात व्हीआरपी सुरक्षा) यातच पोलिस गुंतून राहिल्याने त्याचे तपासाकडे दूर्लक्ष झाले आहे. परिणाम न्यायालयात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण समाधानकारक नाही. न्यायालयात निकाल खूपच उशीरा येतो, त्यावर काही, तरी मार्ग काढला पाहिजे. कारण चकमकफेम अधिकारी उदयाला येण्याचे ते ही एक कारण आहे, असे त्या म्हणाल्या.

राजकीय उद्दिष्टासाठी फोन टॅप करणे बेकायदेशीरच नाही, तर लोकशाहीला धोकादायक सुद्धा आहे, असे मत बोरवणकर यांनी रश्मी शु्क्ला प्रकरणावर व्यक्त केले. पोलिसांचा गैरवापर होत असल्याचे सांगत गुणवत्तेवर त्यांच्या नियुक्त्या झाल्या, तर आपल्याला चांगले पोलिस मिळतील आणि पोलिस दलातील भ्रष्टाचारही कमी होईल, असे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या कामात किमान हस्तक्षेप व त्यांचा कमी गैरवापर होत असलेली केरळमधील पोलिस पद्धत आपल्याकडे अवलंबण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.

Edited By - Amol Jaybhaye   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com