योगेश बहल म्हणाले, 'मी तुझा कार्यक्रम करेन' 

आपल्या जीवाला धोका असून माझे काही बरेवाईट झाल्यास त्याला बहलच जबाबदार असतील, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे.
Former mayor Yogesh Behl threatens youth for criticizing social media
Former mayor Yogesh Behl threatens youth for criticizing social media

पिंपरी : सोशल मीडियावरून टीका करणाऱ्या तरुणाला "मी तुझा कार्यक्रम करेन,' अशी धमकी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी फोनवरून दिली. त्याचा ऑडिओ प्रचंड व्हायरल झाल्याने पिंपरी चिंचवड शहरात तो चर्चेचा विषय झाला आहे. 

दरम्यान, या धमकीनंतर दोन-तीन दिवसांतच या तरुणाच्या बाईकचा अपघात झाला. तो बहल यांनीच घडवून आणल्याचा आरोप त्याने केला आहे. हे आरोप मात्र योगेश बहल यांनी फेटाळून लावले आहेत. 

श्‍याम घोडके असे या तरुणाचे नाव असून त्याचा क्षितिजा टूर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स नावाचा व्यवसाय आहे. स्थानिक पोलिस चौकी वा पोलिस ठाणे मॅनेज होण्याच्या शक्‍यतेतून त्याने थेट पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. मर्यादेत राहिला, तर बरं होईल, नाही तर बायांच्या नादाला लागून तुझा कार्यक्रम होईल, मीच करेन, अशी धमकी माजी महापौर बहल यांनी दिल्याचे घोडके याने सांगितले. यामुळे आपल्या जीवाला धोका असून माझे काही बरेवाईट झाल्यास त्याला बहलच जबाबदार असतील, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे. 

राजकीय पार्श्वभूमी व पैशाच्या जोरावर बहल कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्यामुळे माझ्या कुटुंबालाही धोका असल्याची भीती त्याने वर्तवली आहे. ता. 25 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला आहे. गत महापालिका निवडणुकीला 2017 मध्ये त्याने बहल यांचेच काम केलेले आहे. तसेच 2009 आणि 2014 ची विधानसभा निवडणूक तो अपक्ष म्हणून पिंपरी राखीव मतदारसंघातून लढलेला आहे. 

वायबी असा उल्लेख करीत घोडके याने फेसबुकवर टाकलेल्या आक्षेपार्ह कमेंटमधून हा प्रकार वरकरणी घडला आहे. प्रत्यक्षात बहल यांनी स्पर्श हॉस्पिटलचा उघडकीस आणलेला कोरोना गैरव्यवहाराची किनार त्याला आहे. 

यासंदर्भात माजी महापौर बहल म्हणाले, "घोडके हा खोटं बोलत आहे. तो बिनबुडाचे आरोप करतोय. त्याचा कर्ताकरविता वेगळा आहे. फेसबुकवर त्याने अयोग्य व आक्षेपार्ह कमेंट केल्याने त्याला समजावण्यासाठी फोन केला व माझ्या नादाला लागू नको एवढेच सांगितले. तुझा कार्यक्रम करेन म्हटलं म्हणजे तुझ्याविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करेन, अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेन, असा होता. त्याला जीवे मारण्याचा किंवा अपघात करण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या कॉलचा चुकीचा अर्थ त्याने काढला आहे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com