एकेकाळचा पाव विक्रेता झाला श्रीमंत पिंपरीपालिकेचा आयुक्त

आंतर राज्य प्रतिनियुक्तीवर बदलून आलेले ओरिसा केडरचे आयएएस अधिकारी राजेश पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली. संत मेवालाल महाराज जयंती हा त्यांचा पहिला कार्यक्रम आयुक्त म्हणून झाला.
PCMC New Commissioner Rajesh Patil
PCMC New Commissioner Rajesh Patil

पिंपरी : आंतर राज्य प्रतिनियुक्तीवर बदलून आलेले ओरिसा केडरचे आयएएस अधिकारी राजेश पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली. संत मेवालाल महाराज जयंती हा त्यांचा पहिला कार्यक्रम आयुक्त म्हणून झाला.

पाव विक्रेता ते आयएएस असा नवे आयुक्त पाटील यांचा प्रवास मोठा संघर्षमय व प्रेरणादायी असा आहे. २००५ ला ते सनदी अधिकारी झाले. खानदेशातील (जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील) ताडे हे छोटे खेडेगाव त्यांचे गाव. त्यांचे कष्टकरी कुटुंब. स्वत राजेश यांनी शेतमजुरीचे मिळेल ते काम करून, पाव-भाजीपाला विकून, ट्रॅक्टरवर मजुरी करून, विहिरी खोदून शिक्षण घेतलेले आहे.आयएएस होण्यापूर्वी त्यांची २००० साली भारतीय सांख्यिकी सेवा आणि हवाई दलात त्यांची निवड झाली होती.'ताई, मी कलेक्टर व्हयनु!' हे त्यांचं अनुभवकथन म्हणजे एका  तरुणाचा संघर्षमय प्रवास आहे. त्यातून त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकीची जाण. दिसून येते.त्यांचा यूपीएससी परिक्षेचा प्रवास पुण्यातून सुरु झालेला आहे.

दरम्यान, संतोष पाटील यांच्या पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील बदलीनंतर गल्या दोन महिन्यापासून रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार आजच विकास ढाकणे यांनी स्वीकारला. तरीही तीनपैकी एक अतिरिक्त आयुक्तपद रिक्तच आहे. प्रवीण तुपे यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर तेथे पालिका सेवेतील अधिकाऱ्याची निुयुक्ती अद्याप झालेली नाही. मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील हर्डीकर हे महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतरही सव्वावर्ष आय़ुक्त म्हणून राहिले, हे विशेष. कोरोना काळात इतर सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.मात्र,टर्म पूर्ण होऊनही हर्डीकर पावणेचार वर्ष आयुक्त म्हणून राहिले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com