भाजप उपमहापौरांविरोधात विरोधी पक्ष एकवटले  - All-party agitation against agricultural laws in Pimpri tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

भाजप उपमहापौरांविरोधात विरोधी पक्ष एकवटले 

उत्तम कुटे 
रविवार, 13 डिसेंबर 2020

शेतकरी आंदोलनाला चीन व पाकमधून रसद पुरवठा होत असल्याचे खळबळजनक वक्तव्य उपमहापौर केशव घोळवे यांनी​ केले होते.

पिंपरी : शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्याच्या (ता. 14 डिसेंबर) भारत बंदला भाजप वगळता पिंपरी-चिंचवडमधील सर्व राजकीय पक्ष आणि कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. सहा दिवसांपूर्वी (ता. 8 डिसेंबर) याचप्रश्नी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदमध्येही ते सहभागी झाले होते. 

पिंपरी महापालिकेजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ता. 8 डिसेंबर रोजी समितीने निदर्शने केली होती. तर, उद्या सकाळी ते तहसीलदार कचेरीसमोर तर, त्यानंतर दुपारी महापालिकेसमोर आंदोलन करणार आहे. तहसीलदार आणि महापौरांना निवेदनही ते देणार आहेत. कोविडविषयक नियमांचे पालन करून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

मागच्या बंदच्या दिवशीच (ता. 8 डिसेंबर) झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपमहापौर केशव घोळवे यांनी दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाला चीन व पाकमधून रसद पुरवठा होत असून त्यात भाडोत्री माणसे असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांचाही निषेध करण्यासाठी उद्याचे आंदोलन केले जात असल्याचे सर्वपक्षीय पदाधिकारी व कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले. 

समितीच्या शनिवारी (ता. 12 डिसेंबर) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समितीचे समन्वयक ज्येष्ठ नेते मानव कांबळे, ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, दिलीप पवार, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेवक मारुती भापकर, काशिनाथ नखाते , रोमी संधू, गणेश दराडे, धनाजी येळकर आदी या बैठकीला उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख