चिमुरड्या स्वरा भागवतचे पिंपरीच्या स्पोर्ट्समन पोलिस आयुक्तांकडून कौतुक - PCMC Police Commissioner Congratulated Young Cyclist | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

चिमुरड्या स्वरा भागवतचे पिंपरीच्या स्पोर्ट्समन पोलिस आयुक्तांकडून कौतुक

उत्तम कुटे
सोमवार, 14 डिसेंबर 2020

बारा तासात १४३ किलोमीटर सायकलिंग करण्याचा विक्रम करणारी गोखळी,फलटणची (जि.पुणे) स्वरा योगेश भागवत या सहावर्षीय चिमुरडीची खास दखल पिंपरी-चिंचवडचे स्पोर्ट्समन पोलिस आय़ुक्त कृष्णप्रकाश यांनी घेत तिचे विशेष कौतूक केले.

पिंपरी : बारा तासात १४३ किलोमीटर सायकलिंग करण्याचा विक्रम करणारी गोखळी,फलटणची (जि.पुणे) स्वरा योगेश भागवत या सहावर्षीय चिमुरडीची खास दखल पिंपरी-चिंचवडचे स्पोर्ट्समन पोलिस आय़ुक्त कृष्णप्रकाश यांनी घेत तिचे विशेष कौतूक केले. तिला आयुक्तालयात बोलावून तिचा सत्कार करीत तिला गोड भेट त्यांनी दिली. यावेळी आपल्याला आयपीएस व्हायचं आहे, असे स्वराने सांगताच देशकन्या स्वराचा गर्व आहे, असे आयुक्त भारावून म्हणाले.

सत्कारप्रसंगी आयुक्तांनी स्वराचा उल्लेख आदरार्थी केला.SOMETIMES YOU KNEEL DOWN, SOMETIMES YOY EMBRACE असं या आगळ्या भेटीचं, सत्काराचं,प्रसंगाचं वर्णन आय़ुक्तांनी केलं. स्वरा यांचं कौतूक करावं,तेवढं कमी आहे, असे ते म्हणाले.लॉकडाऊनमुळे यावर्षी पहिलीतही जाऊ न शकलेल्या स्वराचे नाव,मात्र राष्ट्रीयच नाही,तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तिच्या कामगिरीने नेलं आहे.

स्वराचे वडील योगेश हे एसटीच्या फलटण डेपोत कंडक्टर,तर चुलते निलेश भागवत हे पिंपरी पोलिस ठाण्यात असून दुसरे रुपेश हे सध्या नाशिक येथे पीएसआय़चे प्रशिक्षण घेत आहेत. निलेश व योगेश यांनी स्वराच्या कामगिरीची माहिती दिली. गेल्या महिन्यात ४ तारखेला तिने आपले गोखळी गाव ते बारामती-मोरगाव-जेजूरी-फलटण व पुन्हा गोखळी अशी १४३ किलोमीटर सायकल चालवून विक्रम केला.

त्याची लगेचच दखल खुद्द विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेत तिचे को़डकौतुक केले होते. एवढेच नाही,तर ही चिमुरडी ट्रेकरही असून राजगडसह सात किल्यांवर तिने चढाई केलेली आहे. याबरोबर ती रनिंग आणि स्वीमिंगमध्येही तरबेज आहे. सव्वादोन वर्षाची असतानात ती पोहायला शिकली.ती दररोज पाच किलोमीटर रनिंगही करते आहे. तिने शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवशी ८० किलोमीटर (बारामती-माळेगाव-पणदरे-निरा-बारामती)सायकल चालवून आगळी भेट पवारसाहेबांना दिली. वडिल आणि पोलिस काकांमुळे तिला फिटनेसचे बाळकडू घरातच मिळाले आहे.

रनिंग,सायकलिग,स्विमिंगचा अंतर्भाव असलेली अत्यंत खडतर अशी जागतिक पातळीवरची अल्ट्रामन स्पर्धा जिंकणारे कृष्णप्रकाश यांच्या व्हिडिओतून लेकीने स्फूर्ती घेतलेली असल्याने त्यांच्या भेटीची तिला ओढ होती,असे योगेश बाबर आज सरकारनामाशी बोलताना म्हणाले. तर, स्वराच्या सायकलिंग विक्रमाचा व्हिडीओ सोशल मिडियावर कृष्णप्रकाश यांच्यासह ६५ लाख लोकांनी पाहिला होता. त्यामुळे कृष्णप्रकाश यांनाही स्वराला भेटायचे होते. त्यातून परवा हा योग जुळून आला. त्यांनी तिला खास आयुक्तालयात बोलावून तिच्याशी सत्कारानंतर गप्पाही मारल्या.एवढ्या मोठ्या व्यक्तीची भेट होऊन ती आपल्या मुलीचा सत्कार करतील,असे वाटले नव्हते,अशी प्रतिक्रिया योगेश यांनी या भेटीवर दिली.स्वराला फिटनेसचे धडे देणारे तिचे चुलते निलेश भागवत हे आमच्या पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याने स्वराला आयुक्तांकडून मिळालेली पोचपावती हा आमच्या पोलिस ठाण्याचाही गौरव असल्याचे पिंपरी पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक राजेंद्र निकाळजे म्हणाले.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख