पिंपरी पोलिस आय़ुक्तांची विशेष मुलांसह दिपावली

कर्तव्यकठोर असलेले पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश तेवढेच संवेदनशीलही आहेत.त्यामुळेच ते दरवर्षाची दिवाळी विशेष (दिव्यांग) मुले आणि निराधारांसोबत साजरी करतात. त्यानुसार यावर्षीही त्यांनी बावधन येथील निराधार विशेष मुलांचा आनंद द्विगुणित केला.
पिंपरी पोलिस आय़ुक्तांची विशेष मुलांसह दिपावली
PCMC Police Commissioner Diwali with Special Children

पिंपरीः कर्तव्यकठोर असलेले पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश तेवढेच संवेदनशीलही आहेत.त्यामुळेच ते दरवर्षाची दिवाळी विशेष (दिव्यांग) मुले आणि निराधारांसोबत साजरी करतात. त्यानुसार यावर्षीही त्यांनी बावधन येथील निराधार विशेष मुलांचा आनंद द्विगुणित केला. त्यांना फराळ आणि मिठाई देऊन त्यांची दिवाळी आयुक्तांनी  गोड तर केलीच.शिवाय या मुलांना हिवाळा सुरु झाल्याने स्वेटरही दिले.

पिंपरी-चिंचवडसारखी फिल्ड पोस्टिंग असो वा नसो अशी खास दिवाळी साजरी करण्याचा सुरु केलेला पायंडा आय़ुक्त कृष्णप्रकाश यांनी आतापर्यंत कधीही चुकविलेला नाही. साईड पोस्टिंग असली,तरी ते निराधार ज्येष्ठ,मुले यांना शोधून वा ते असलेल्या संस्था,शाळेत जाऊन ते अशी दिवाळी साजरी करतात.यावर्षी त्यांनी बावधन येथील अनिकेत सेवाभावी संस्था संचालित ओम श्री साई मतिमंद मुलांच्या शाळेतील ५६ मुलांना दिवाळीचा फराळ, मिठाई आणि स्वेटर दिले. 

यामुळे ही मुले हरखून गेल्याचे पाहायला मिळाले.या अशा विशेष मुलांसोबत दिवाळी साजरी करायला मिळणे हे मी माझे भाग्यच समजतो, अशी प्रांजळ प्रतिक्रिया त्यांनी यावर्षीच्या आपल्या या खास दिवाळीवर सरकारनामाला दिली.स्वतच स्वताचा प्रकाशणारा दिवा व्हा म्हणजेच स्वयंप्रकाशित व्हा हे बुद्धांचे वचन त्यांनी यानिमित्त सांगितले.आपल्या कर्मचाऱ्यांप्रतीही ते संवेदनशील आहेत. कर्तव्यावर असताना यावर्षी आतापर्यंत मृत्यू पावलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील पोलिसांच्या कुटुंबियांची सुद्धा दिवाळी त्यांनी आनंदी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही त्यांनी शुभेच्छाकार्ड व मिठाई घरपोच दिली.

फिजीकली फिट,प्रामाणिक व कर्तव्यकठोर असलेले कृष्णप्रकाश यांनी शहरात येताच बेकायदेशीर धंद्याविरुद्ध मोहीम उघडली. त्याला आश्रय देणाऱ्या पोलिस ठाणे प्रमुख तथा वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या त्यांची उचलबांगडी नुकतीच केली. त्यामुळे त्यांची येथील कारकिर्द लक्षात राहणारी ठरेल,असेच त्यांच्या कामगिरीवरून दिसते आहे. कारण आतापर्यंतच्या शहराच्या दोन्ही पोलिस आय़ुक्तांना म्हणावा असा प्रभाव पाडता आलेला नाही.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in