भाजप प्रदेशाध्यक्षपदावरून चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करा : ब्राह्मण महासंघाची मागणी 

सुरक्षित अशा ब्राह्मणबहुल कोथरुड मतदार संघात घुसखोरी केली.
Expel Chandrakant Patil from the post of BJP state president: Demand of Brahmin Federation
Expel Chandrakant Patil from the post of BJP state president: Demand of Brahmin Federation

पिंपरी : कणकवली येथील सभेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ब्राह्मण समाजाबद्दल अपमानास्पद टिपणी केली आहे. त्यांची प्रदेशाध्यक्ष पदावरुन भाजपने हकालपट्टी करावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केली आहे. 

पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या कुलकर्णी यांनी याबाबत पत्रकात म्हटले आहे की, कणकवली येथे गुरुवारी झालेल्या सभेत चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण द्वेषाची गरळ ओकली आहे. मुस्लिम बाबराचे नव्हे तर दाते, गोडसे, गाडगीळांचे वंशज आहेत, अशी अपमानास्पद टिप्पणी करून ब्राह्मण समाजाबद्दल असलेल्या मानसिकतचे दर्शन घडविले आहे. 

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे. स्वत:च्या कर्तृत्वामुळे आपल्या जिल्ह्यातून निवडून न येण्याची खात्री पाटलांना पटली होती. यानंतर सुरक्षित अशा ब्राह्मणबहुल कोथरुड मतदार संघात घुसखोरी केली. विद्यमान ब्राह्मण आमदारांची उमेदवारी कापून आयत्या बिळावरील नागोबासारखे बसले आहेत. 

अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना आता ब्राह्मण समाज अद्दल घडवणार आहे. भाजपने पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी. भाजपने ब्राह्मणांना गृहीत धरण्याची भूमिका या पुढेही चालु ठेवल्यास पक्षालाही अद्दल घडविण्यात येईल, असा इशाराही पत्रकाद्वारे दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com