गजा मारणेच्या साथीदारांकडून ४ कोटींच्या मोटारी जप्त

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुण्यातील सराईत गुन्हेगार गजानन ऊर्फ गज्या मारणे टोळीच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली असून त्यासाठी विशेष टीमची (एसआयटी) स्थापना केली आहे. दहशत माजवल्याप्रकरणी त्याच्या १७ साथीदारांना अटक केली असून फरार गज्यासह नऊजणांच्या मागावर नऊ पथके आहेत.
Pimpri Police Confiscated Motor Cars of Gaja Marne Gang Members
Pimpri Police Confiscated Motor Cars of Gaja Marne Gang Members

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुण्यातील सराईत गुन्हेगार गजानन ऊर्फ गज्या मारणे टोळीच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली असून त्यासाठी विशेष टीमची (एसआयटी) स्थापना केली आहे. दहशत माजवल्याप्रकरणी त्याच्या १७ साथीदारांना अटक केली असून फरार गज्यासह नऊजणांच्या मागावर नऊ पथके आहेत.

१७ जणांत दोन चिंचवडचे, तर एक मावळातील आहे. तळोजा तुरुंगातून सुटल्यानंतर काढण्यात आलेल्या जंगी मिरवणुकीत वापरण्यात आलेल्या चार कोटी रुपयांच्या ११ आलिशान मोटारी आणि १२ महागडे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.

१५ तारखेला तुरुंगातून सुटताच नवी मुंबई ते पुण्यापर्यंत द्रुतगती महामार्गावरून गज्याची त्याच्या साथीदारांनी मिरवणूक काढली होती. कोरोना काळात शे-दोनशे गाड्यांतून काही शेकडोजणांनी कोरोना निर्बंधांची ऐशीतैशी करीत मिरवणूक काढल्याने गज्या व त्याच्या साथीदारांविरुद्धचा पहिला गुन्हा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यावर १६ तारखेला नोंदविण्यात आला होता. त्यानंतर पुण्यात कोथरुड नंतर हिंजवडी व घाटाखालीही खोपोली इथे असे एकूण पाच गुन्हे दाखल झाले होते. १५ च्या रात्री ऊर्से टोलनाक्याजवळील फूडमॉलजवळ गज्या व साथीदारांनी आरडाओरडा करीत, फटाके वाजवून दहशत निर्माण केली.ड्रोनव्दारे त्यांनी मिरवणुकीचे शूटिंगही केले होते.

गुंडाची मिरवणूक काढून त्यांचे उदात्तीकरण करण्याच्या या घटनेवर पिंपरी-चिंचवडचे खमके पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी  नाराजी वर्तवून खमकी कारवाई सुरु केली आहे. त्यासाठी पोलिसांची गुन्हे शाखा व तांत्रिक शाखा मिळून विशेष टीम तयार करण्यात आली आहे. त्यांनी सागर सुखदवे थिटमे (वय २५,रा.धायरी,पुणे),सागर वसंत शेंडे (वय २९), संतोष चंद्रकांत शेलार (वय ३६) माऊली रामदास शेलार (वय २०,तिघेही रा. कोंढवे धावडे,पुणे),रघुनाथ चंद्रकांत किरवे (वय ४९,रा. भोर,पुणे),आशिष वसंत अवघडे (वय २३,रा. उत्तमनगर,पुणे),अनिल राजाराम मदने (वय ४२,रा.औंध,पुणे),मयूर अर्जून गाडे (वय२१),शुभम मनोहर धुमणे (वय २३) आणि व्यंकटेश व्यंकय्या स्वर्पराज (वय ३६,दोघेही रा.धानोरी,पुणे), शैलेंद्र रविंद्र गावडे (वय ३०, रा.चिंचवड), अखिल जयवंत उभाळे (वय २७, रा. विश्रांतवाडी,पुणे),अभिजीत विजय घारे (वय ३५, रा. बेबडओहळ)अनिल संपत जाधव (वय ३७)आणि निलेश रामचंद्र जगताप (वय ३९, दोघेही रा. पुरंदर), रोहन अर्जून साठे (वय ४५, रा. येरवडा,पुणे),योगेश राम कावली (वय २८, रा.चिंचवड)अशी अटक केलेल्यांची नावे असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी सांगितले.

तर, गज्या ऊर्फ गजानन पांडुरंग मारणे, रुपेश कृष्णराव मारणे, सचिन अप्पा ताकवले,श्रीकांत संभाजी पवार, अनंता ज्ञानोबा कदम,प्रदीप दत्तात्रेय कंदारे, बापू श्रीमंत पवार, गणेश नामदेव हुंडारे, सुनील नामदेव बनसोड हे फरार आहेत. त्यांच्यासह दीडशे दोनशे वाहने व आरोपींना पकडण्यासाठी नऊ पथके तयार करण्यात आली आहेत.दरम्यान, पकडलेल्या आरोपींची न्यायालयात जामीनावर सुटका झाली आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com