स्थायीतून मिळाले नवे कारभारी - दादा,भाऊ गटांना समान संधी - PCMC Standing Committee News Members Names Announced | Politics Marathi News - Sarkarnama

स्थायीतून मिळाले नवे कारभारी - दादा,भाऊ गटांना समान संधी

उत्तम कुटे
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समितीवरील कार्यकाळ संपलेल्या आठ सदस्यांच्या जागी नव्यांच्या नावांची घोषणा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज करण्यात आली. त्यावरून गोंधळ झाल्याने ही सभा सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली.

पिंपरी : पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समितीवरील कार्यकाळ संपलेल्या आठ सदस्यांच्या जागी नव्यांच्या नावांची घोषणा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज करण्यात आली. त्यावरून गोंधळ झाल्याने ही सभा सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली.

दरम्यान, गेल्या चार वर्षात संधी न मिळाल्याने नाराज असलेल्यांची स्थायीवर वर्णी लावून त्यांना मनवण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. तर,ही नियुक्ती करताना शहर भाजपच्या दोन्ही कारभारी आमदार (चिंचवडचे लक्ष्मणभाऊ जगताप आणि भोसरीचे महेशदादा लांडगे) समर्थक नगरसेवकांना समान न्याय देऊन निवडणुकीच्या तोंडावर नाराजी आणखी वाढणार नाही,याची काळजी घेतली गेली आहे. या फॉर्म्युल्यानुसार भोसरी व चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी दोघांना स्थायीवर घेण्यात आले आहे. तर, राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेना आणि अपक्ष एकेक असे इतर चार सदस्य स्थायीवर नव्याने आले आहेत.

महापौरपदाची इच्छा असलेल्या चिंचवडमधील भाजप नगरसेविकेची स्थायीवरही  वर्णी न लागल्याने भाजपमधून राष्ट्र्वादीत स्वगृही परतण्याची सुरवात चिंचवडमधील या नगरसेविकेपासून होणार अशी चर्चा आताच सुरु झाली आहे. दरम्यान,अजित पवार यांची पुण्यात भेट घेतलेल्या भाजपच्या भोसरीतील नगरसेवकाला, मात्र स्थायीवर घेऊन भोसरीतील संभाव्य धोका तूर्त, तरी टाळण्यात आला आहे.

 भाजपने नितीन लांडगे, रवी लांडगे,शत्रुघ्न काटे,सुरेश भोईर,तर  आणि  (सर्व भाजप), शिवसेनेकडून मीनल यादव यांना तर राष्ट्रवादीने प्रवीण भालेकर आणि राजू बनसोडे शिवसेनेने मीनल यादव,तर भाजप संलग्न अपक्ष आघाडीने निता पाडाळेंना स्थायीवर नवे कारभारी म्हणून नेमले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख