कॉंग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठेंचा अचानक राजीनामा

बिहारमधील कॉंग्रेसच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर इकडे महाराष्ट्रात पक्षाच्या एका जिल्हाध्यक्षाने तडकाफडकी राजीनामा दिल्याने तो आज चर्चेचा विषय झाला. पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष सचिन साठे यांनी अचानक आज आपला राजीनामा दिला.
कॉंग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठेंचा अचानक राजीनामा
PCMC Congress Chief Sachin Sathe Resigns from the post

पिंपरी : बिहारमधील कॉंग्रेसच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर इकडे महाराष्ट्रात पक्षाच्या एका जिल्हाध्यक्षाने तडकाफडकी राजीनामा दिल्याने तो आज चर्चेचा विषय झाला. पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष सचिन साठे यांनी अचानक आज आपला राजीनामा दिला. पक्षात डावलले जात असल्याने त्यांनी तो दिल्याचे समजते. मात्र, पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गेली दोन तप ते कॉंग्रेसमध्ये एकनिष्ठपणे काम करीत आहेत. विधानपरिषदेवर आपली नियुक्ती होईल, अशी आशा त्यांना होती. त्याखेरीजही पक्ष राज्यात सत्तेत असूनही महामंडळ तथा इतर कुठलेही महत्वाचे पद न मिळाल्याने ते नाराज होते. त्यातूनच त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.त्यांची शहराध्यक्षपदाची ही दुसरी टर्म आहे. अद्याप त्यांची दोन वर्षे बाकी होती. 

यापूर्वीही त्यांनी असाच राजीनामा दिला होता.मात्र,त्यावेळी त्यांची समजूत घालण्यात आल्याने त्यांनी तो मागे घेतला होता. यावेळी,मात्र तसे काही होणार नाही, असे त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले.मात्र, इतर पक्षात जाणार नसून कार्यकर्ता म्हणून पक्षात कार्यरत राहणार असल्याचेही ते म्हणाले.सायंकाळी पत्रकारपरिषद घेऊन ते याबाबत घोषणा करणार आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in