आमदार सुनील शेळकेंच्या त्या टीकेला बाळा भेगडेंनी दिले चोख उत्तर
Former MLA Bala Bhegade thanked Pandharpurakar for winning the by-election

आमदार सुनील शेळकेंच्या त्या टीकेला बाळा भेगडेंनी दिले चोख उत्तर

राष्ट्रवादीच्या आमदारांनी पंढरपुरात येवून मलाच आव्हान दिले होते.

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे निरीक्षक म्हणून माजी राज्यमंत्री बाळा  उर्फ संजय भेगडे (Bala Bhegade) यांनी महत्वाची भूमिका पार पडली. अटीतटीच्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे विजय झाल्याने पक्ष निरीक्षक म्हणून त्यांच्या प्रयत्नांना यश आले. पोटनिवडणुकीच्या विजयाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या नाकावर टिच्चून त्यांनी पंढरपूर-मंगळवेढकरांचे जाहीर आभार मानले आहेत. (Former MLA Bala Bhegade thanked Pandharpurakar for winning the by-election)

राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ला असलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी समाधान आवताडे यांची भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पक्ष निरीक्षक म्हणून बाळा भेगडे यांनी कार्यकर्त्यांची फौज तयार केली होती. निवडणूक प्रचार काळात त्यांनी तब्बल 15 दिवस पंढरपुरात तळ ठोकून दोन्ही तालुक्यांत प्रभावीपणे प्रचार यंत्रणा राबवली.

दरम्यान, बाळा भेगडेंच्या प्रभावी प्रचार यंत्रणेला शह देण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांचे कट्टर विरोधक मावळचे आमदार सुनील शेळके यांना भगिरथ भालकेंच्या प्रचारासाठी पंढरपूरच्या मैदानात उतरवले होते. आमदार शेळके यांनी मतदार संघात प्रचार सभा घेवून माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंवर टीका केली होती. ज्यांना स्वतःच्या मतदार संघात निवडून येता आलं नाही. ते दुसऱ्यांना काय निवडून आणणार आहेत, अशी टीक करत आमदार शेळकेंनी भेगडे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या टिकेला बाळा भेगडेंनी चोख उत्तर दिले. प्रचारा दरम्यानही माजी मंत्री भेगडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यात चांगलाच  कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले.

प्रचारादरम्यान भेगडे यांनी पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधून त्यांना कामाला लावले होते. तर परिचारक व आवताडे यांच्यापासून दुरावलेल्या काही नेत्यांना पुन्हा सक्रीय करण्यासाठी त्यांनी विशेष लक्ष घातले होते. या वेळी त्यांनी अनेक राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेऊन समाधान आवताडे यांना मदत करण्याचे आवाहनदेखील केले होते.

निकालानंतर त्यांच्या कामगिरीची दखल पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या विजयबद्दल पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व मतदारांचे व भाजप कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पोटनिडणुकीसाठी पक्षनिरीक्षक म्हणून दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली. त्यात मला व भाजपच्या सर्वच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीला यश मिळाले. राष्ट्रवादीच्या आमदारांनी पंढरपुरात येवून मलाच आव्हान दिले होते. त्यांचे ते आव्हान स्वीकारून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यात आम्ही यशस्वी झालो.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in