गौतम चाबुकस्वारांचा पराभव गाफील राहिल्यामुळे झाला : खासदार बारणेंनी दिली कबुली 

त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी गाफील राहू नये.
गौतम चाबुकस्वारांचा पराभव गाफील राहिल्यामुळे झाला : खासदार बारणेंनी दिली कबुली 
The defeat of Gautam Chabukaswar was due to negligence: MP Barne confessed

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत चुकीच्या पद्धतीने कामे होत आहेत. ठेकेदारांचा गैरकारभार सुरू असून त्याद्वारे महापालिकेची लूट चालली आहे. या ठेकेदारांना पालिका अधिकारी आणि सत्ताधारी पाठिशी घालत आहेत, असा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपचे नाव न घेता केला. रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी त्याला विरोध करावा आणि या गैरकारभाराची करदात्या नागरिकांना जाणीव करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत गाफील राहिल्याने पिंपरी विधानसभा मतदारसंघात ऍड गौतम चाबुकस्वार यांचा पराभव झाला. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी गाफील राहू नये. आतापासून जोरदार तयारी करावी. आत्मविश्वासाने आणि सक्षमपणे या निवडणुकीला तोंड द्यायचे आहे, असेही बारणे म्हणाले. 

सन 2022 च्या महापालिका निवडणुकीची तयारी शिवसेनेने आतापासूनच सुरु केली आहे. त्याकरिता प्रभागनिहाय बैठकांचा धडाका लावला आहे. या मिशन 2022 अंतर्गत दापोडीतील बैठकीत बारणे बोलत होते. माजी आमदार गौतम चाबुकस्वार, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख योगेश बाबर, सरिता साने, प्रतीक्षा घुले, विभागप्रमुख तुषार नवले आदी या वेळी उपस्थित होते. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून करत असलेले काम जनतेपर्यंत पोचवा आणि आगामी महापालिका निवडणूक 
डोळ्यासमोर ठेवून काम करा, असा सल्लाही बारणे यांनी या वेळी शिवसैनिकांना दिला. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in